Onion Prices: लाल कांद्याला मिळाला रेकॉर्डब्रेक 5100 रुपयांचा बाजारभाव, चांदवड बाजारसमितीने मोडले हंगामातील सर्व विक्रम.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन लाल कांद्याची (Red Onion Prices ) विक्री सुरू झाली असून, प्रशासक अनिल पाटील, सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे यांनी आसरखेडे येथील शेतकरी पवन पवार यांच्या कांद्याला सर्वाधिक 5 हजार 100 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला असल्याचे सांगितले. गुरुवारी (24) रोजी
अवकाळी पावसामुळे लवकर आलेला लाल कांदा खराब झाला असून यंदा लाल कांद्याचे उत्पादन थोडे कमी झाले आहे. त्यामुळे लाल कांदा अजूनही कमी प्रमाणात विकला जात आहे. सध्या तालुक्यातील काही शेतकऱ्यांचे लाल कांदा पीक काढणीला आले आहे.
त्यामुळे चांदवड बाजार समितीत लाल कांदा विकला जात आहे. गुरुवारी (दि. 24) आसरखेडे येथील शेतकरी पवन पवार यांनी कांदा विक्रीसाठी आणला होता. 5100 रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा व्यापाऱ्यांनी खरेदी केला. एकीकडे बाजारात लाल कांद्याला चांगला भाव मिळत आहे, तर दुसरीकडे उन्हाळ कांद्याचा भाव 1000 रुपयांपर्यंत खाली आला आहे.
उन्हाळ कांद्याचा बाजारभाव किमान 400 रुपये ते कमाल 2,100 रुपये आणि सरासरी 1,170 रुपये प्रति क्विंटल होता. तसेच भुसार शेतीमालाची सुमारे तीन हजार क्विंटल आवक झाली. यामध्ये मका कृषी उत्पादनांना किमान 1765 ते कमाल 2111 आणि सरासरी 1970 रुपये भाव मिळाला. सोयाबीनचा किमान भाव 3,000 रुपये व कमाल 5,500 रुपये तर सरासरी भाव 5,300 रुपये होता.
कांदा प्रतवारी करून आणावा:
चांदवड बाजार समितीमध्ये कृषी मालाची विक्री केल्यानंतर लगेच रोख पेमेंट केले जाते, त्यामुळे तालुक्यातील, तालुक्याबाहेरील व इतर जिल्ह्यातील शेतकरी चांदवड बाजार समितीत शेतीमाल विक्रीसाठी येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुकवून त्याची प्रतवारी करून चांदवड बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री करावी. तसेच विक्रीची रक्कम रोखीने घ्यावी. मालाची विक्री, वजन किंवा देयकाबाबत कोणतीही तक्रार आल्यास तत्काळ बाजार समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासक अनिल पाटील व सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे यांनी केले आहे.
1 thought on “Onion Prices: लाल कांद्याला मिळाला रेकॉर्डब्रेक 5100 रुपयांचा बाजारभाव, चांदवड बाजारसमितीने मोडले हंगामातील सर्व विक्रम.”