कृषी योजना:
कांद्याच्या किमती गेल्या काही महिन्यांपासून सतत वाढत असून, अद्यापही त्या थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. राज्यभरातील विविध बाजारपेठांमध्ये दरात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होत आहेत. शेतकरी आणि ग्राहक दोघेही या वाढत्या दरांमुळे चिंतेत आहेत.
देशभरातील महत्त्वाच्या राज्यांमध्ये आजचे कांदा बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत:
मध्य प्रदेशातील बाजारभाव
➜ भोपाळ – ₹1,325 ते ₹2,200 प्रति क्विंटल
➜ देवरी – ₹1,500 प्रति क्विंटल
➜ इंदूर – ₹1,565 प्रति क्विंटल
➜ नीमच – ₹1,640 ते ₹2,251 प्रति क्विंटल
➜ रतलाम – ₹2,181 ते ₹2,481 प्रति क्विंटल
➜ शाजापूर – ₹1,114 ते ₹2,440 प्रति क्विंटल
महाराष्ट्रातील बाजारभाव
➜ छत्रपती संभाजीनगर – ₹1,000 ते ₹2,600 प्रति क्विंटल
➜ देवळा – ₹700 ते ₹2,280 प्रति क्विंटल
➜ कल्याण – ₹2,700 ते ₹2,800 प्रति क्विंटल
➜ पुणे – ₹1,300 ते ₹2,600 प्रति क्विंटल
➜ सांगली – ₹1,000 ते ₹3,000 प्रति क्विंटल
➜ वाशी, नवी मुंबई – ₹1,400 ते ₹2,800 प्रति क्विंटल
राजस्थानमधील बाजारभाव
➜ जयपूर – ₹2,000 ते ₹3,000 प्रति क्विंटल
➜ भिलवाडा – ₹2,000 ते ₹3,000 प्रति क्विंटल
➜ श्रीगंगानगर – ₹2,600 ते ₹3,000 प्रति क्विंटल
➜ बिकानेर – ₹1,900 ते ₹2,100 प्रति क्विंटल
उत्तर प्रदेशातील बाजारभाव
➜ अलाहाबाद – ₹2,600 ते ₹2,700 प्रति क्विंटल
➜ आझमगड – ₹2,675 ते ₹2,825 प्रति क्विंटल
➜ बहराइच – ₹2,700 ते ₹2,900 प्रति क्विंटल
➜ बलिया – ₹2,700 ते ₹2,760 प्रति क्विंटल
हेही वाचा… कांदा चाळ 50 टक्के अनुदान योजना
भाववाढीचे कारण काय?
➜ पुरवठा कमी आणि मागणी जास्त – यंदा उत्पादनात घट झाल्याने बाजारात कांद्याची आवक कमी आहे, त्यामुळे दर वाढत आहेत.
➜ हवामानाचा परिणाम – काही भागांत पावसामुळे कांदा खराब झाला आहे, त्यामुळे चांगल्या कांद्याचे दर वाढले आहेत.
➜ निर्यात वाढली – परदेशात कांद्याला चांगला दर मिळत असल्याने निर्यात वाढली आहे, परिणामी देशांतर्गत बाजारात किंमत वाढली आहे.
कांदा दर लवकर स्थिर होण्याची शक्यता नाही
सध्याच्या स्थितीनुसार कांद्याचे दर पुढील काही आठवडे तरी उच्चस्तरावर राहतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. सरकारी हस्तक्षेप किंवा मोठ्या प्रमाणावर नवीन कांद्याची आवक झाल्यासच किंमती स्थिर होऊ शकतात.
ताज्या बाजारभावांसाठी आमच्या वेबसाइटला नियमित भेट द्या!