शेतात जाण्यासाठी रस्ता नाही | रस्ता आहे परंतु अडवला आहे | किंवा रस्ताच नाहीये | कसा मिळेल रस्ता ?| Shet Rasta Magni Arj Pdf

शेतात जाण्यासाठी रस्ता नाही | रस्ता आहे परंतु अडवला आहे | किंवा रस्ताच नाहीये | कसा मिळेल रस्ता ?| Shet Rasta Magni Arj Pdf. No road to farm | There is a road but it is blocked Or no road | How to get the road? | Shet Rasta Magni Arj Pdf /शेत रस्ता अर्ज | शेत रस्ता मागणी | शेत रस्ता कायदा | | Shet Rasta Magni Arj Pdf.

टीम कृषी योजना / Krushi Yojana

शेत रस्ता कायदा व रस्त्याचे नियम तुमच्या शेतात जाण्यासाठी पूर्वीपासूनच नकाशावर उपलब्ध असलेला रस्ता कुणी अडविला असेल तर मामलेदार कोर्ट ॲक्ट १९०६ कलम ५ नुसार तहसीलदार यांना रस्ता मागणी अर्ज Rasta magni arj करू शकतात. ( No road to farm | There is a road but it is blocked Or no road | How to get the road? | Rasta Magni Arj Pdf )

अर्ज केल्याने रस्त्यातील अडथळा दूर करता येतो, तहसीलदार यांच्याकडे याविषयी दाद मागता येते. परंतु तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ताच नसेल तर अशा वेळी नवीन रस्त्यासाठी महाराष्ट्र जमीन अधिनियम १९६६ च्या कलम १४३ अन्वये तहसीलदारांकडे नवीन रस्त्यांची मागणी करता येते. दोन वेगवेगळ्या प्रकरणात दोन वेगवेगळ्या नियमानुसार मागणी करता येते. या व्यतिरिक्त कलम 143 काय आहे,अगोदरच उपलब्ध असलेला रस्ता अडविणे, रस्त्यावरून शेतात जाऊ न देणे याविषयी कायदेशीर मार्ग कसा काढावा.?

वाचा हा सविस्तर लेख

शेती रस्ता संपूर्ण माहिती Agricultural road complete information

१ पूर्वीपासूनच रस्ता उपलब्ध होता परंतु आता तो अडविला आहे.
२) शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता हवा आहे.

वरील दोन पर्यायांपैकी आज आपण शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता कसा मिळवावा यासाठी अर्ज कसा करावा लागतो.

शेतातील रस्ता कायदा पहा Shet Rasta Kayda

पूर्वी प्रत्येकास शेतजमिनी मोठ्या प्रमाणात होत्या व त्या प्रमाणात शेती करणाऱ्यांची संख्या कमी असायची. वहीती जमीन कमी व पडीत क्षेत्र जास्त असल्यमुळे शेतात जाण्या येण्यासाठी रस्त्यांची फारशी अडचण निर्माण होत नसत.
आज जमिनी कमी झाल्या,शेतात पिकवलेला शेतीमाल बाजारात विक्री साठी नेण्यासाठी रस्ता अत्यावश्यक आहे त्यासाठी रस्ता मागणी अर्ज Rasta magni arj करावा लागतो.

 हे ही वाचा ..

पशुपालन व दुग्धव्यवसायाच्या प्रगतीसाठी शासनाची योजना | ९० टक्के कर्ज फक्त ३ टक्के व्याजदराने.

कांदा साठवणुकीची नवी पद्धत ; दोन वर्षे टिकतो कांदा | ‘या’ शेतकऱ्याने सांगितली नवीन पद्धत

गाई व म्हैस गोठा अनुदान योजना 2021 | 77000 रुपये अनुदान मिळणार | असा करा अर्ज

शेतात जाण्यासाठी रस्ता पाहिजे असेल तर आपणास रस्ता मागणी अर्ज Rasta Magni arj करावा लागेल. महाराष्ट्र जमीन अधिनियम १९६६ च्या कलम १४३ अन्वये तहसीलदारांकडे नवीन रस्त्यांची मागणी करता येते किंवा तुमचा आधीचा उपलब्ध रस्ता कोणी अडविला असेल तर मामलेदार कोर्ट ॲक्ट १९०६ कलम ५ नुसार तहसीलदार यांना रस्त्यासास्ठी अर्ज करून दाद मागता येते. तहसील कार्यालयात सदरचा अर्ज आपणास उपलब्ध होईल अथवा शासनाच्या वेब साईट वर अर्ज मिळू शकेल.

शेतरस्ता Shet Rasta Arj मिळणेसाठी अर्ज सादर केल्यावर पुढील प्रक्रिया काय.?

रस्ता मागणी अर्ज Rasta Magni Arj दाखल केल्यानंतर संबधित तालुक्याच्या तहसीलदार यांच्या कडून अर्ज केलेल्या व्यक्तीस व ज्या शेतकऱ्यांच्या भूमापन क्रमांकाच्या सिमांवरून रस्त्याची मागणी केली आहे त्या सर्वांना नोटीस दिली जाते. यासंदर्भात त्यांचे म्हणणे किंवा मत मांडण्याची संधी त्यांना देण्यात येते.

तहसीलदार यांचेकडून स्थळ पाहणी केल्यावर अर्जदाराला शेतात जाण्यासाठी रस्त्याची आवश्यकता आहे काय याची खात्री केली जाते.

अर्जदाराने अर्ज करतांना सोबत कच्चा नकाशा जोडलेला असतो यावरून कमीत कमी किती फुटांचा रस्ता देणे गरजेचे आहे याची शहानिशा केली जाते.

ज्या व्यक्तीने Shet Rasta शेतरत्यासाठी अर्ज केला आहे त्या व्यक्तीच्या जमिनीचे मूळ मालक कोणत्या रस्त्याचा वापर करत होते याविषयी चौकशी केली जाते. अर्जदारास शेतरस्ता द्यावयाचा झाल्यास सर्वात जवळचा मार्ग कोणता यावर विचार केला जातो.

अर्जदारांनी मागणी केलेला अर्ज हा सरबांधावरून आहे काय याची खात्री करण्यात येते.

जर अर्जदाराला शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता दिला गेला तर लगतच्या शेतकऱ्यांचे शेतीचे किती नुकसान होऊ शकते याची पाहणी करण्यात येते.

अर्जदारास नवीन रस्ता देणे गरजेचे आहे याची खात्री झाल्यानंतर सदरील रस्ता हा लगतच्या शेतीच्या हद्दी/बांधावरून देण्यात येतो आणि आशा वेळी लगतच्या शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान होईल हे पहिले जाते.

वरील सर्व बाबींची शहानिशा करून तहसीलदार नवीन शेतरस्ता देण्यासंबधी आदेश अर्ज मान्य करू शकतात किंव शेत रस्त्याची मागणी फेटाळू शकतात.तहसीलदारांकडे सर्व अधिकार असतात.

वरील माहिती आपणास आवडल्यास इतर ग्रुप अथवा फेसबुक वर शेअर करा अथवा इतर शेतकरी बांधवांना नक्की फॉरवर्ड करा.

शेत रस्ता अर्ज | शेत रस्ता मागणी | शेत रस्ता कायदा | | Shet Rasta Magni Arj Pdf.

2 thoughts on “शेतात जाण्यासाठी रस्ता नाही | रस्ता आहे परंतु अडवला आहे | किंवा रस्ताच नाहीये | कसा मिळेल रस्ता ?| Shet Rasta Magni Arj Pdf”

  1. माहिती शेतकरी वर्गाकरिता अत्यन्त उपयुक्त आहे, पण तहसीलदार याकडे दुर्लक्ष करतात अनेक तालुक्यात असे कितीतरी रस्त्याचे पेंडिंग प्रकरणे आहेत त्याचा वेळीच निपटारा होत नाही ?

    Reply
    • हा प्रकार तोपर्यंत चालत राहिल तोपर्यंत तहसीलदार व कक्लेकटर यांना 31 दिवसाचा टायमिग देत नाही

      Reply

Leave a Reply

Don`t copy text!

Discover more from krushiyojana.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading