नवीन विहीर अनुदान योजना 2021 | बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना | योजनेची संपूर्ण माहिती. New Well Grant Scheme 2021 | Birsa Munda Krishi Kranti Yojana Complete information of the scheme
टीम कृषी योजना / Krushi Yojana
नवीन विहीर अनुदान योजना 2021 प्रकल्प 2020 – 21 अखेरपर्यंत राबविण्यासाठी बैठकीमध्ये मंजूर करण्यात आलेल्या 100 कोटी अतिरिक्त निधीपैकी उर्वरित निधी रक्कम रुपये 23 कोटीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती त्या बाबतचा निर्णय शासनाने घेतला असून नवीन विहीर अनुदान योजना 2021 साठी नवी मंजुरी देण्यात आली आहे.
राज्यातील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गाच्या शेतकर्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या कार्यक्रमांतर्गत 1.5 लाख मर्यादेपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गा च्या शेतकऱ्यांना नवीन विहीर या बाबींसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजनेच्या धर्तीवर उच्चतम अनुदान मर्यादा रुपये 2.5 लाख प्रति लाभार्थी अनुदान मिळेल.
राज्यातील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गाच्या शेतकर्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या कार्यक्रमांतर्गत 1.5 लाख मर्यादेपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गा ज्या शेतकऱ्यांना नवीन विहीर या बाबींसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना 2021 या योजनेच्या धर्तीवर उच्चतम अनुदान मर्यादा रुपये 2.5 लाख प्रति लाभार्थी राहील.
नवीन विहिरींचे बांधकाम 2.50 लाख रुपये जुन्या विहिरींच्या दुरुस्ती साठी 50 हजार रुपये इन्व्हल बोरिंग 20 हजार रुपये पंप सेट 20 हजार रुपये वीज कनेक्शन 90 हजार रुपयेफार्म ऑन प्लास्टिक लाइनिंग1 लाख रुपयेमायक्रो सिंचन 50 हजार रुपये स्प्रिंकलर इरिगेशन सेट 25 हजार रुपयेपीव्हीसी पाईप 30 हजार रुपये बाग 500 रुपये
विहीर अनुदान योजना 2021 योजनेसाठी पात्रता. Eligibility for Well Grant Scheme 2021 Scheme
- उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
- लाभार्थींची वार्षिक उत्पन्न १.५ लाखा पेक्षा कमी असले पाहिजे.
- लाभार्थीकडे जमीन कमीत -कमी 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत असणे बंधनकारक आहे.
- जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असला पाहिजे.
- लाभार्थीने जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
- नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर जमीन पाहिज.
- RKVY अंतर्गत नवीन विहीर अनुदान योजना 2021 कागदपत्रे
- ज्या जागेवर विहीर घ्यावयाची आहे त्याजागेचा फोटो
- जातीचे प्रमाणपत्र
- अपंग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
- गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
- लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.( स्टॅम्प पेपरवर)
- 7/12 व 8-अ चा उतारा
- कृषि अधिकारी यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
- भूजल सर्वेक्षण विकास पाणी उपलब्धतेचा दाखला
- ____________________________________
- किसान क्रेडिट कार्ड तक्रार Kisan Credit Card Complent : जर बँक किसान क्रेडिट कार्ड देण्यास नकार देत असेल तर येथे तक्रार करा
- कृषी यंत्रे: या कृषी यंत्रांनी खरीप पिकांची काढणी होईल सुलभ.
वरील माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना नक्की पाठवा.
आम्ही आपणास जी योजनेची माहिती दिली आहे त्या बाबत आपण आपल्या नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयात,सेतू अथवा आपले सरकार केंद्रात जाऊन माहिती घेऊ शकता. वरील शासकीय योजना असल्याने कोठा पूर्ण झाल्यावर योजना बंद देखील होऊ शकतात.
mdipak1925@gmail.com