Nafed Onion News: नाफेडच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फटका, कांद्याचे भाव वाढ रोखण्यासाठी नाफेडने घेतला हा निर्णय.

Advertisement

Nafed Onion News: नाफेडच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फटका, कांद्याचे भाव वाढ रोखण्यासाठी नाफेडने घेतला हा निर्णय.Nafed Onion News: Farmers hit by Nafed’s decision, Nafed has taken this decision to stop the increase in onion prices.

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातील विविध बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावामध्ये प्रती क्विंटल आठशे ते एक हजार रुपयापर्यंत दरवाढ झाल्याचे दिसून आले आहे, गेल्या आठवड्यामध्ये सोळाशे ते आठराशे रुपये प्रतिक्विंटल विकणारा कांदा 2500 ते 2800 रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री होत आहे काही मार्केट कमिटी मध्ये तर काही ठराविक कांद्यास 3000 ते 3200 पर्यंत देखील भाव मिळाल्याचे दिसून आले आहे परंतु ही भाव वाढ होताच नाफेड ने भाववाढ रोखण्यासाठी काही पावली उचलली आहेत चला तर पाहूयात त्याबद्दलचा हा लेख.

Advertisement

सणासुदीच्या काळात कांद्याचे भाव वाढू नयेत यासाठी नाफेडने विविध राज्यांमध्ये 20 हजार टन कांदा वितरित केला आहे.

देशातील कांद्याचे भाव अचानक वाढू नयेत म्हणून केंद्र सरकारने कांद्याचा राखीव साठा ठेवला आहे.
गेल्या तीन आठवड्यात 20 हजार टन कांदा विविध राज्यांना देण्यात आला.

Advertisement

हा कांदा दिल्ली, पाटणा, लखनौ, चंदीगड, चेन्नईसह इतर शहरांना देण्यात आला आहे. देशात साधारणपणे ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान कांद्याचे भाव वाढतात.

या दरम्यान कांद्याच्या पुरवठ्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने नाफेडने अडीच लाख टन कांदा खरेदी केला आहे. 20 हजार टन कांदा यापूर्वीच निघाला आहे.

Advertisement

नाफेडने एप्रिल व मे महिन्यात कांद्याची खरेदी केली होती. तो कांदा सध्याच्या बाजारभावाने राज्यांना पुरवला जात आहे.

सध्या ईशान्येत कांद्याचा भाव 40 रुपये किलो आहे. तर इतर भागात 25 ते 30 रुपये आहे.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page