Mukhyamantri Kisan Yojana Maharashtra: महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री किसान योजनेची घोषणा, शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार सहा हजार रुपये. Mukhyamantri Kisan Yojana Maharashtra: Announcement of Mukhyamantri Kisan Yojana in Maharashtra state, farmers will get Rs.6 thousand every year.
केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री किसान योजना’ ( Mukhyamantri Kisan Yojana Maharashtra ) ही योजना लागू करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यात आज शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या PM किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात आता ‘मुख्यमंत्री किसान योजना’ ( Mukhyamantri Kisan Yojana Maharashtra ) सुरू करण्यात येणार असून या योजनेत पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना अटीशर्थी व निकष याबाबत लवकरात लवकर निर्णय जाहीर होणार आहे.
शेतकरी बांधवांना सतत भेडसावणाऱ्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी त्यांना आधार मिळावा या हेतूने 2018 या वर्षांमध्ये मोदी सरकारकडून PM किसान योजनेस सुरुवात करण्यात आली. या PM किसान योजनेअंतर्गत मोदी सरकारकडून प्रतिवर्षी देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2 हजार असे तीन टप्यात सहा हजार रुपये जमा करण्यात येत असतात. केंद्राच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात शिंदे सरकार कडून हि योजना लागू करण्यात येणार आहे.
पुढील आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पा मध्ये मुख्यमंत्री किसान योजनेसाठी तरतूद करण्यात येणार आहे.
CM किसान योजनेद्वारे प्रत्येक वर्षी राज्यातील पात्र शेतकरी बांधवांना प्रत्येकी 6 हजार रुपये देण्यात येणार आहेत.महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय समजला जात आहे. पंतप्रधान किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 3 टप्यात पैसे बँक खात्यात जमा केले जातात, त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यात देखील मुख्यमंत्री किसान सम्मान निधी योजना ( Mukhyamantri Kisan Yojana Maharashtra ) राबवली जाणार आहे. आता मुख्यमंत्री किसान योजनेत केंद्राच्या धर्तीवर प्रत्येकी 4 महिन्यातून एकदा 2 हजार रुपये दिले जातात की प्रत्येक महिन्याला टप्या टप्याने दिले जातील याबाबत लवकरच संपूर्ण माहिती जाहीर होईल. महाराष्ट्र राज्यात लवकरच मुख्यमंत्री किसान योजना ( Mukhyamantri Kisan Yojana Maharashtra ) लागू करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. पुढील आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात येणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी या योजनेतुन 6000 रुपये देण्यात येतील.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्णयाची शक्यता..!
राज्यात पुढील काळात नगर पालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुका येत आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही येणार आहेत.याच पार्श्वभूमीवर राज्यातील मतदार शेतकरी आपल्याकडे वळवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची शक्यता आहे,त्याच बरोबर राज्यात झालेले सत्ताकारण व त्यातून राज्यात झालेली राजकीय परिस्थिती,यातून शिवसेनेविषयी मतदारांमध्ये निर्माण झालेली सहानुभूती कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असण्याची शक्यता आहे.
1 thought on “Mukhyamantri Kisan Yojana Maharashtra: महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री किसान योजनेची घोषणा, शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार सहा हजार रुपये.”