Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

Monsoon Alert Maharashtra june 2021: पुढील 5 दिवस महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा ;राज्यातील या जिल्ह्यात रेड अँलर्ट.

 

टीम कृषी योजना /Krushi Yojana

नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनने (Monsoon 2021) आता महाराष्ट्रात चांगलाच जोर धरला आहे. मान्सूननं मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र (Monsoon Alert Maharashtra) व्यापला आहे.काही भागात पाऊसास सुरुवात देखील झाली तर अनेक ठिकाणी आणखीन पाऊस नसल्याने बळीराजा आकाशाकडे आस लावून आहे. राज्यात पुढील ५ दिवस जोरदार पाऊसाचा अंदाज आहे. मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं (IMD) दिला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजपासून (11 जून) पुढील पाच दिवस राज्यातील विविध जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसह शहरवासीयांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मुंबईसह ठाणे,पालघर, आणि कोकण पट्ट्यात पावसाचा जोर अधिक राहील. त्याच बरोबर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याबाबत हवामान तज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी ट्वीट करून राज्यातील हवामानाची माहिती दिली आहे.

मुंबईसह रायगड, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यामध्ये साधातर 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाला सज्ज राहण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.या सूचनेनुसार त्या त्या जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.

मराठवाड्यात नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर विदर्भात ही काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Leave a Reply

Don`t copy text!