Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

यांत्रिकीकरण ट्रॅक्टर अनुदान योजना 2021 | योजनेची संपूर्ण माहिती व अर्ज करण्याची पद्धत

Mechanization Tractor Grant Scheme 2021 | Complete information of the scheme and method of application

टीम कृषी योजना / Krushi Yojana

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती बरोबर आधुनिकतेची कास धरावी व त्यातुन आपली प्रगती साधावी या साठी केंद्र व राज्यसरकार प्रयत्न करत असते.शेतकरी हिताच्या अनेक योजना सुरू आहेत. पारंपरिक शेती सोबत यांत्रिकीकरण करावे यासाठी सरकारने ट्रॅक्टर अनुदा योजना सुरू केली आहे.

इतर योजना – कुसुम सौर पंप योजना 2021 | Kusum Solar Pump Online form

शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे हा योजनेचा मुख्य हेतू आहे.त्याचबरोबर कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिका द्वारे सहभागीदारांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे.

ट्रॅक्टर अनुदान योजनेची पात्रता काय

शेतकरी अनु.जाती, अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक असणार आहे.

फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार

शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.

शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा.

कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे.

एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल.

ट्रॅक्टर अनुदान योजना 2021साठीची आवश्यक कागदपत्रे कोणती.?

आधार कार्ड

७/१२ उतारा

८ अ दाखला

खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल

जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )

स्वयं घोषणापत्र

पूर्वसंमती पत्र

ट्रॅक्टर अनुदान योजना 2021 साठी खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल:

ट्रॅक्टर

पॉवर टिलर

ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे

बैल चलित यंत्र/अवजारे

मनुष्य चलित यंत्र/अवजारे

प्रक्रिया संच

काढणी पश्च्यात तंत्रज्ञान

फलोत्पादन यंत्र/अवजारे

वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे

स्वयं चलित यंत्रे

अर्ज कुठे करावा .?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण नजीकच्या सेतू कार्यालयात अथवा आपले सरकार केंद्र या ठिकाणी जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता अथवा आपल्या जवळच्या कृषी विभागाशी संपर्क करून माहिती घ्या.

 

वरील माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना नक्की पाठवा.

वरील योजना शासकीय योजना असून वरील योजना सुरू आहे की नाही याची माहिती आपण सेतू अथवा आपले सरकार केंद्रातून घेऊ शकता.आमचा हेतू सदर योजना आपल्या पर्यंत पोहोचवणे हा आहे.

Leave a Reply

Don`t copy text!