Maharashtra Milk Subsidy : दुधाचे अनुदान अडकले शेतकरी पुन्हा प्रतिक्षेत, दूध उत्पादकांनी करावे तरी काय… Maharashtra Milk Subsidy: Milk subsidy is stuck, farmers are waiting again, what should milk producers do…
Maharashtra Milk Subsidy : राज्य शासनाकडून गायीच्या दुधाच्या दरात कपात करण्यात आली आहे.यावर राज्यातील अनेक दूध उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी याला जोरदार विरोध केला.
राज्य सरकारकडून गायीच्या दुधाच्या किमतीत कपात करण्यात आली यावर राज्यातील अनेक दूध उत्पादक शेतकरी आणि संघटनांनी जोरदार विरोध केला. गेली दोन महिने केवळ पशुधनाची इयर टॅग नोंदणी आणि दूध उत्पादकांच्या आधार नं आणि बँक खाते नोंदणीचा वेळ वाया गेला आहे. राज्यामध्ये काही ठिकाणीच अनुदान मिळाले आहे. तर काही ठिकाणी अनुदान देण्याबाबत अजूनही प्रशासकीय पातळीवर पूर्तता पूर्ण झालेली दिसून येत नाही. त्यातच 11 तारखेपासून 5 रु. अनुदान बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे राज्य शासन शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचा आणि अनुदान बुडविण्याच्या विचारात तर नाही ना, असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित होतोय.
तथापि लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्यानंतर लोकसभेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आचार संहितेच्या काळात शासनास दूध दरवाढीची घोषणा करता येणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना दरवाढ मिळणार नाही. उन्हाळ्यात मे अखेर 13 मार्चच्या मंत्रिमंडळ बैठकीत ठरल्याप्रमाणे 3.5 फॅट व 8.5 SNF साठी केवळ 20 रुपये दर मिळणार असल्याने शेतकऱ्यांना पदरमोड करून दुभती जनावरे सांभाळावी लागणार आहेत.
25 ते 30 लिटर दूध देणाऱ्या व दूध उत्पादन घटलेल्या सुमारे 70 हजार ते 1 लाखांपर्यंतच्या गायी केवळ 10 ते 15 हजार रुपया पर्यंत खाली आल्या आहेत, ऐन आचारसंहितेच्या तोंडावर राज्य सरकारने 5 रु. अनुदान बंद केल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.आज बाजारात सरकीचा दर 30 रुपये, पेंडीचा दर 34 रुपये किलो आणि दुधास 20 रुपये दर मिळणार असल्याने शासकीय धोरणाने शेतकऱ्यांवर भीक मागण्याची वेळ आणली आहे.