कापसाचे भाव ७,००० रुपयांपेक्षा अधिक राहणार , चीनकडून मागणीत वाढ

लागवड क्षेत्रात घट, अतिवृष्टीमुळे नुकसान यामुळे कापसाला अधिक भाव मिळण्याचे संकेत.

Advertisement

कापसाचे भाव ७,००० रुपयांपेक्षा अधिक राहणार , चीनकडून मागणीत वाढ Cotton prices will remain above Rs 7,000, with demand from China increasing

टीम कृषी योजना / Krushi Yojana

Advertisement

जागतिक बाजारात कापसाचे भाव वाढल्याने यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत कापसाच्या दरात तेजी राहणार असल्याचे संकेत( Indications that cotton prices will continue to rise this year compared to last year ) कापूस अभ्यासकांसह व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहेत.

खासगी बाजारात साडेसहा ते सात हजारांपेक्षा अधिक दर राहू शकतात. सध्या बाजारात कापूस आला नसला तरी कापूस निघाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि अतिवृष्टीने झालेले नुकसान यामुळे शेतकऱ्यांकडूनही जास्तीत जास्त दराची मागणी होत आहे.

Advertisement

अतिवृष्टीमुळे यंदा कापसाचे नुकसान झाले असून चीनसारख्या देशांमधून मागणीही अधिक राहत असल्याने राज्यात कापसाचे भाव तेजीत राहण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. केंद्र शासनाने चालू हंगामासाठी लांब धागा कापसास किमान आधारभूत किंमत ६ हजार २५ तर रुपये प्रतिक्विंटल तर मध्यम घागा कापसास किंमत ५ हजार ७३६ रुपये प्रतिक्विंटल निर्धारित केली आहे. तरी बाजारात कापूस आल्यानंतर ७ हजार रुपयांवर भाव राहणार असल्याचे व्यापारी सांगतात. यंदा सततच्या पावसाने राज्यात कापसाचे नुकसान झाले आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने शेतकऱ्यांकडून ८-१० हजार रु. भावाची अपेक्षा व्यक्त होत आहे.

जागतिक स्तरात उच्चांक

तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात यंदा कापसाचे भाव १० वर्षांतील उच्चांकीवर आहेत. अमेरिकेत अतिवृष्टी झाल्यामुळे कापसाचे पीक खराब झाले आहे. राज्यातही हिच स्थिती आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. शिवाय चीनमधून कापसाची मागणी मोठी आहे. परिणामी भाव वाढीचे संकेत आहेत.

Advertisement

६ टक्क्यांची घट : कपाशीचे महाराष्ट्रातील सर्व साधारण लागवड

बागायती भागात खरेदी सुरू: अकोल्यातील गाठ व्यापारी संतोष राठी सांगतात, ७ हजार रुपयांच्या खाली भाव राहणार नाहीत. सात ते साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटल कापूस विकला जाईल. • मलकापूर, नांदुरा (जि.बुलडाणा) अकोट (अकोला), दर्यापूर, अंजनगाव (अमरावती) या भागात व्यापाऱ्यांकडून खरेदी सुरू झाली आहे.

तेजी राहणार

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाचे भाव तेजीत राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या कापसाच्या किती गाठी शिल्लक आहेत. यंदा किती गाठींची असणार आहे. सध्या सहा ते साडेसहा हजारांपासून खरेदी सुरू आहे. – डॉ. संजय काकडे, कापूस – कृषी विद्यावेत्ता, कापूस संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला

Advertisement

सौंजन्य – दिव्य मराठी 

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page