Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

Kapus Bajar Bhav: कापूस बाजार भावात वाढ, पहा महाराष्ट्रातील आजचे बाजार भाव.

Kapus Bajar Bhav: कापूस बाजार भावात वाढ, पहा महाराष्ट्रातील आजचे बाजार भाव.

कृषी योजना: 

शेतकरी मित्रांनो आपण पाहत आहोत की गेल्या काही दिवसांपासून कापसाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे, कापसाच्या सुरुवातीला कापसाचे दर उंचाकी पातळीवर होते 8500 ते 9000 रुपये क्विंटप पर्यंत कापूस विक्री होत होता. अनेक शेतकऱ्यांनी कापूस विक्री केली नाही कापसाची साठवणूक करून स्टॉप करून कापूस ठेवला होता. उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळे कापसाच्या वजनात देखील काहीशी घट झाली असून भाव वाढतील या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबवली होती परंतु दरवाढ न झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली होती.मागील काही दिवसात 6500 रुपयांपर्यंत खाली कापसाचे दर आले होते परंतु  गेल्या काही दिवसापासून कापूस दरामध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे आज कापूस सात हजार रुपये ते सात हजार तीनशे रुपये क्विंटल(प्रतवारी नुसार)  विक्री होत आहे. चला तर आज आपण जाणून घेऊया राज्यातील महत्त्वाच्या काही बाजार समिती मधील आजचे कापुस बाजार भाव.

जात/प्रतवारी जिल्हा बाजार समिती प्रतवारी प्रकार
महाराष्ट्र बुलढाणा देउळगाव राजा कापूस देशी 08/06/2023 6500 7230 7155
महाराष्ट्र नागपूर सावनेर कापूस इतर 08/06/2023 7150 7175 7175
महाराष्ट्र नागपूर उमरेड कापूस देशी 08/06/2023 6500 7260 7100
महाराष्ट्र चंद्रपूर वरोरा कापूस देशी 08/06/2023 6800 7285 7000

वरील दर हे किमान दर, कमाल दर व सरासरी दर आहेत.

शेतकरी मित्रांनी बाजार समिती मध्ये बाजार भावाची खात्री करूनच शेतमालाची विक्री करावी.

 

Leave a Reply

Don`t copy text!