Kapus Bajar Bhav: आनंदवार्ता: कापसाच्या दरात भाववाढ सुरू; आज राज्यात कापूस तेजीत.
Kapus Bajar Bhav: आनंदवार्ता: कापसाच्या दरात भाववाढ सुरू; आज राज्यात कापूस तेजीत. Kapus Bajar Bhav: Good news: Cotton prices continue to rise; Cotton is booming in the state today.
नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी योजना डॉट कॉम या आपल्या वेबसाईट मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे, आपण आज महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावांची माहिती जाणून घेणार आहोत. राज्यांमध्ये विविध बाजार समितीमध्ये आज कापसाची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती, आज कापसाच्या भावामध्ये 200 ते 250 रुपयांपर्यंत बाजार भाव वाढले असून मागील बाजारांच्या तुलनेत आज बऱ्यापैकी भाव वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. राज्यासह देशातील शेतकरी बांधव कापूस भाव वाढ होणार म्हणून अनेक दिवसापासून कापसाचा साठा करून ठेवला आहे, परंतु कापूस दरामध्ये घसरन होत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली होती आज झालेल्या भाववाढीने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून येत्या काळात आणखी किती भाव वाढ होते हे लवकरच कळेल.