Kapus Bajar Bhav: कापूस भाव वाढणार..! देशातील कापूस बाजाराची काय स्थिती आहे, नोव्हेंबर महिन्यात कापूस बाजार कसा राहील, जाणून घ्या

Kapus Bajar Bhav: कापूस भाव वाढणार..! देशातील कापूस बाजाराची काय स्थिती आहे, नोव्हेंबर महिन्यात कापूस बाजार कसा राहील, जाणून घ्या. Kapus Bajar Bhav: Cotton price will increase..! What is the state of the cotton market in the country, know how the cotton market will be in the month of November

देशातील बाजारपेठेत कापसाची आवक घटली होती. परंतु उद्योगांकडून मागणी वाढल्याने कापसाचे भाव Kapus bajar bhav  सुधारले. गेल्या तीन दिवसांपासून देशात कापसाचे भाव वाढले आहेत. आजही कापसाच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे.

अन्नधान्य आणि खाद्यतेलाच्या दरात सुधारणा झाल्याचा फायदा सध्या कापसाच्या दराला होत आहे. गेल्या तीन दिवसांत कापसाच्या दरात सुधारणा झाली आहे. देशातील कापूस हंगाम 1 ऑक्टोबरपासून सुरू झाला. मात्र देशात पिकवलेला कापूस सप्टेंबर महिन्यापासून बाजारात विक्रीसाठी येत आहे.

मात्र दिवाळीपर्यंत कापसाचे भाव दबावाखाली राहिले. हंगामाच्या सुरुवातीला काही दिवस कापसाचा बाजारभाव Kapus bajar bhav सात हजार ते दहा हजार रुपये प्रतिक्विंटल होता. ते 7 हजार 500 रुपये करण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी कापसाची विक्री कमी केली.

दिवाळीनंतर बाजारात कापसाची आवक कमी झाली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव वाढले. त्यामुळे देशातील कापूस बाजाराला आधार मिळाला.गेल्या आठवड्याच्या तुलनेत कापसाच्या भावात प्रतिक्विंटल 500 ते 1000 रुपयांची सुधारणा दिसून आली.

आजही काही बाजारात कापसाच्या भावात क्विंटलमागे 100 ते 300 रुपयांनी वाढ झाली आहे. तर अनेक बाजारात दर स्थिर आहेत. आज अनेक बाजारात कापसाचा कमाल भाव 9000 हजार रुपयांवर पोहोचला.

पुढील काही दिवस कापसाचे भाव वाढतील, असा अंदाज काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे येत्या एक-दोन महिन्यांत कापसाला सरासरी नऊ हजार रुपयांच्या पुढे मिळण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

1 thought on “Kapus Bajar Bhav: कापूस भाव वाढणार..! देशातील कापूस बाजाराची काय स्थिती आहे, नोव्हेंबर महिन्यात कापूस बाजार कसा राहील, जाणून घ्या”

Leave a Reply

Don`t copy text!

Discover more from krushiyojana.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading