Kanda Bajar Bhav: घोडेगावात कांदा 4300 रुपये क्विंटल, लिलावात मिळाला विक्रमी बाजार भाव.
मागील काही दिवसांपासून देशात व राज्यात कांदा दरात घसरण झाली, कांदा बाजार 1500 रुपयांपर्यंत खाली घसरले,यामुळे शेतकरी हताश झाले होते, परंतु आज अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव कांदा मार्केट मध्ये कांदा दरात मोठी वाढ झाली आहे, शनिवार दि. 3 डिसेंबर रोजी झालेल्या कांदा लिलावात लाल कांद्यास 4300 रुपये इतका विक्रमी दर मिळाला आहे.
आज घोडेगाव ता-नेवासा या बाजार समितीमध्ये 70 हजार 338 कांदा गोणी इतकी आवक झाली होती, ही आवक 380 ट्रक इतकी होती. देशात उन्हाळी कांद्यास मागणी कमी असून नवीन लाल कांद्यास मागणी वाढली आहे, लाल कांद्याची आवक बाजारात कमी आहे, मागणी अधिक व पुरवठा कमी असल्या कारणाने शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असून, शेतकरी आनंदित आहेत.
बाजार समिती आवारात शेतकरी आपला कांदा विक्रीसाठी घेऊन आले, समिती आवारात शेतकरी,ट्रक, ट्रॅक्टर,टेम्पो व इतर वाहनांची मोठी वर्दळ होती, सकाळी ठीक 11 वाजता कांदा लिलावास सुरुवात झाली,यामध्ये लाल कांद्यास विक्रमी 4300 रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला, घोडेगाव कांदा मार्केट मधील गौरव ट्रेडिंग कंपनी मध्ये आज हा उच्चांकी दर मिळाला. बाजारभावाचे व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.
उन्हाळी गावरान कांद्यास मिळालेले दर
भारी कांदा – 1800 ते 1900 रुपये.
मोठा कलर पत्ती असणारा कांदा – 1500 ते 1700
मुक्कल भारी – 1300 ते 1400 रुपये
गोल्टा – 900 ते 1050 रुपये
गोल्टी – 600 ते 700 रुपये
जोड कांदा – 300 ते 500 रुपये
हलका डॅमेज कांदा – 200 ते 400 रुपये इतका दर मिळाला.
नवीन लाल कांद्यास मिळालेले दर
मोठा कलर पत्तीवाला कांदा – 2800 ते 3200 रुपये
मुक्कल भारी – 2000 ते 2500 रुपये
गोल्टी – 800 ते 1000 रुपये
गोल्टा – 1400 ते 1600 रुपये
एक दोन लॉट – 2500 ते 4300 रुपये या दराने विक्री झाले.
शेतकरी मित्रांनो आपल्याकडील कांदा विक्री करण्यापूर्वी बाजार समितीत बाजार भावाची खात्री करूनच खरेदी विक्री करावी ही नम्र विनंती.