कपाशीचे एकरी ५१ क्विंटल उत्पादन घेणे शक्य, कापूस लागवडीतील अमृत पॅटर्न

कापूस उत्पादक शेतकरी मेळावा संपन्न

Advertisement

कपाशीचे एकरी ५१ क्विंटल उत्पादन घेणे शक्य, कापूस लागवडीतील अमृत पॅटर्न. It is possible to get 51 quintals of cotton per acre, Amrut pattern in cotton cultivation

कापूस उत्पादनाचा ‘अमृत पॅटर्न’ हे शेतकऱ्याचे संशोधन – मा. आ. पांडुरंगजी अभंग

Advertisement

कापूस पिकाचे फरदडी सहित एकरी ५१ क्विंटल उत्पादन घेणे शक्य आहे असे प्रतिपादन ‘अमृत पॅटर्न’ चे जनक अमृतराव देशमुख यांनी श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने द्वारा आयोजित कापूस उत्पादक शेतकरी मेळाव्यात केले. नेवासा येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात दि. ३१ मे, २०२२ रोजी ‘कापूस उत्पादक शेतकरी’ मेळावा पार पडला. कपाशी पिकाचे उत्पादन घेत असताना अमृतराव देशमुख यांनी स्वत:च्या शेतीत केलेले प्रयोग आणि एकरी ५१ क्विंटल उत्पादन घेणे कसे शक्य झाले याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. कापूस पिक लागवड पद्धतीतील बदल, खतांचे व पाण्याचे योग्य नियोजन आणि कीड-रोग नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन यातून ‘अमृत पॅटर्न’ कसा तयार झाला याविषयीचे अनुभव त्यांनी या मेळाव्यात बोलत असताना कथित केले.

कापूस उत्पादनाचा ‘अमृत पॅटर्न’ हे शेतकऱ्याचे संशोधन आहे असे प्रतिपादन मा. आ. पांडुरंगजी अभंग यांनी केले. केव्हीके दहिगाव-ने द्वारा आयोजित कापूस उत्पादक शेतकरी मेळाव्यात ते अध्यक्ष पदावरून बोलत होते. खरीप हंगामाच्या तोंडावर कृषि विज्ञान केंद्राने आयोजित केलेला कापूस उत्पादक मेळावा नक्कीच कौतुकास्पद आहे. केव्हीके दहिगाव-ने च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी शेतीचे विकसित तंत्रज्ञान आपल्या शेतावर राबवावे व उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवावे. शेती व्यवसाय हा आता योग्य ज्ञान घेऊन, सुशिक्षित होऊन केला तरच आपला निभाव लागेल असे अभंग यांनी याप्रसंगी सांगितले. कापूस पिकावरील कीड-रोग नियंत्रणावर शेतकऱ्यांचा जास्त खर्च होत आहे त्यामुळे उत्पन्नात घट येते, याकरिता एकात्मिक पद्धतीने कमीत कमी खर्चात कापूस पिकावरील कीड-रोग नियंत्रणाचे उपाय केव्हीके चे प्रभारी प्रमुख माणिक लाखे यांनी मेळाव्याला उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना सांगितले.
या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर लोकेनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक काशिनाथ नवले, काकासाहेब शिंदे, अशोकदादा मिसाळ, डॉ. अशोक ढगे व कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ उपस्थित होते. सचिन बडधे, दहातोंडे, प्रकाश बहिरट, वैभव नगरकर, अनिल देशमुख व इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजि.राहूल पाटील यांनी केले तर आभार प्रकाश हिंगे यांनी मानले.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page