Monsoon Alert : पुढचे पाच दिवस अतिमूसळधार पाऊस; या जिल्ह्यात रेड ऍलर्ट

Advertisement

Monsoon Alert : पुढचे पाच दिवस अतिमूसळधार पाऊस; या जिल्ह्यात रेड ऍलर्ट ( Monsoon Alert: Heavy rain for next five days; Red alert in this district )

टीम कृषी योजना / Krushi Yojana

Advertisement

महाराष्ट्रातील नागरिकांना व शेतकरी बांधवांना हवामान विभागाने हा इशारा दिला आहे, यामुळे मुंबई जिल्हा व कोकण मधील ह्या जिल्ह्यांचं टेन्शन वाढनार आहे. तर राज्याच्या इतर काही भागामध्ये तुरळक पावासाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मान्सूनने राज्यातील बहुतांश भागात कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे, भारतीय हवामान विभागाने कोकण मध्ये पुढील पाच दिवसांसाठी रेड व ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला असून. याचेवळी राज्याच्या अनेक भागात तुरळक किंवा मध्यम स्वरूपाच्या पावासाचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement

हवामान विभागानं 18 जुलै पासून कोकण मधील सर्व जिल्हे व मुंबई, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग , कोल्हापूरला जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट दिलेला आहे. सोमवार दि.19 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा व पुणे या जिल्ह्यांना व कोल्हापूरला रेड अ‌ॅलर्ट दिलेला आहे. वरील सर्व जिल्ह्यात अतिवृष्टी ते अतिमुसळधार असा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे, असा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे.

Advertisement

तर या जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी…

रविवार दि. 18 जुलै रोजी पालघऱ, ठाणे, पुणे व सातारा या जिल्ह्याना ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर, सोमवार 19 जुलै रोजी पुणे, ठाणे व पालघर मध्ये ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केलेला आहे तर मंगळवार 20 जुलै बुधवार 21 जुलै व गुरुवार 22 जुलै रोजी कोकण मधील सर्व जिल्हे व पश्चिम महाराष्ट्रा मधील सातारा, पुणे व कोल्हापूर।या जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे.रेड व ऑरेंज ऍलर्ट जारी केलेल्या या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यांना आहे येलो ऍलर्ट…

भारतीय हवामान विभागा मार्फत नंदूरबार, अमरावती,नागपूर, अकोला, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलाडाणा, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या सर्व जिल्ह्यात येलो अ‌ॅलर्ट जारी केला आहे. सोमवार दि. 19 जुलै रोजी बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा,यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, लातूर सोलापूर व सांगली जिल्ह्यांना येलो अ‌ॅलर्ट जारी केलेला आहे. 20 जुलै रोजी अमरावती व नागपूर तर 21 जुलै रोजी चंद्रपूर व गडचिरोली तसेच 22 जुलै रोजी भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना येलो अ‌ॅलर्ट जारी केला आहे. वरील येलो अ‌ॅलर्ट जारी केलेल्या जिल्ह्यांमध्ये काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page