जर असे झाल्यास 2023 मध्ये पाऊसच पाऊस पडणार – पंजाबराव डख

जर असे झाल्यास 2023 मध्ये पाऊसच पाऊस पडणार – पंजाबराव डख. If this happens, in 2023 it will only rain – Punjabrao Dakh

शेतकऱ्यांना शेतीच्या नुकसानीपासून वाचविण्यासाठी हवामानाच्या अभ्यासाचा उपयोग करतो, भविष्यातही शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज खूप महत्वपूर्ण आहे. यापुढे निसर्गाच्या विरुद्ध शेती करू नका, असे आवाहन हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी केले. कुकाणा येथे एका मल्टिस्टेट को -ऑप क्रेडिट सोसायटीच्या वर्धापन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पंजाब डख म्हणाले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून मी हवामान अंदाज सांगत असतो. अवघ्या तीनच मिनटांत पाच लाख लोकांना मेसेज गेल्याने शेतकऱ्याचे शेतीचे योग्य नियोजन करून नुकसान टाळले जाते. नगर जिल्ह्यात पूर्वेकडून पाऊस आला, तर खूप पाऊस पडतो, जर असे झाल्यास 2023 मध्ये खूप पाऊस पडणार असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितले. या कार्यक्रमात पंजाबराव डख यांच्यासोबत सेल्फी व फोटो घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

या कार्यक्रमास माजी आमदार पांडुरंग अभंग, ज्येष्ठ नेते भय्यासाहेब देशमुख, प्रा. नारायणराव म्हस्के, माजी सरपंच दौलतराव देशमुख, सरपंच संदीप देशमुख, अशोकराव मंडलिक, एकनाथ कावरे यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Don`t copy text!