शेतकऱ्यांनो कांदा विक्री करताय तर थोडं थांबा ! कांदा लवकरच 50 रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता. If farmers are selling onions, wait a minute! Onion is likely to go up to Rs 50 per kg soon.
शेतकरी मित्रांनो गेल्या 15 ते 20 दिवसांपासून नाफेड व मोठ्या व्यापाऱ्यांकडून स्वस्त कांद्याची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू करण्यात आली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याची घटलेली मागणी अचानक वाढली असून, पुढील काही दिवसांत कांद्याच्या दरात मोठी भाव वाढ होण्याची शक्यता पहायला मिळू शकते.
देशात सर्वच स्तरावर महागाईचा भडका उडाला आहे. वाढत्या महागाईने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. इंधनापासून ते खाद्य तेलापर्यंत (Edible oil) सर्वच वस्तूंचे भाव दुपटीने वाढले आहेत.याच बरोबर भाजीपाला देखील मागे राहिला नव्हता,भाजीपाल्याच्या दराने नवे उच्चांक गाठले होते,परंतु कांद्यास भाव नसल्याने शेतकऱ्यांना शेतीखर्च निघणेही कठीण झाले आहे, परंतु आता शेतकरी बांधवांसाठी ही बातमी अतिशय आनंददायी आहे, म्हणजेच येत्या 2 महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये कांद्याचे दर नवा उच्चांक गाठणार (Onion) असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या जुलैमध्ये कांद्याचे दर 50 ते 60 रुपये किलोपर्यंत जाऊ शकतात असा अंदाज असून त्याबाबतचे काही म्हत्वाचे कारणे आहेत.यातील महत्त्वाचे व मुख्य कारण म्हणजे नाफेडकडून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदीला सुरुवात झाली आहे. नाफेडने कांदा खरेदी सुरू केली असल्याने आता मोठे व्यापारी देखील कांदा खरेदीत उतरले आहेत. व्यापारी मोठ्या प्रमाणात कांद खेरेदी करून त्याची साठवणूक करत आहेत. कांद्यांची अधिक मागणी वाढल्याने पुढील एक -दोन महिन्यात कांद्याच्या दरात मोठी भाववाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नाफेडकडून कांद्याची खरेदी सुरू
मार्च महिन्यापासून नवीन उन्हाळी कांद्याच्या दरात मोठी घसरन दिसून आली आहे, घसरलेल्या कांद्याच्या भावाचा फायदा उठवून नॅशनल अॅग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया ‘नाफेडने’ मोठा प्रमाणात कांदा खरेदीला सुरुवात केली आहे. नाफेडच्या प्रमाणेच व्यापारी हे देखील शेतकऱ्यांकडून स्वस्तात उपलब्ध होणारा हा कांदा खरेदी करत आहेत.कांद्याचे आगार म्हणून ओळखले जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात सध्या खूप मोठ्या प्रमाणात उन्हाळी (नाशिक) कांद्याची खरेदी व विक्री होत आहे. सध्याच्या परिस्थितीत मागणीहुन अधिक प्रमाणात पुरवठा होत असल्या कारणाने कांद्याचे दर ढासळले आहेत.परंतु नाफेड व व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करण्याचा धडाका लावला आहे,याच कारणाने कांद्याची उपलब्धता कमी होऊन कांद्याचे दर 50 ते 60 रुपयांवर पोहोचू शकतात असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
टीप – वरील माहिती ही शेतकरी, व्यापारी व सद्य परिस्थिती याचा अभ्यास करून बनवली आहे, शेतकरी बांधवांनी व व्यापारी मित्रांनी कांदा खरेदी व विक्री ही आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून करावी,कृषी योजना डॉट कॉम हे स्पष्ट करत आहे.