Government assistance: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मिळणार 1000 कोटींची मदत,19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार लाभ

Advertisement

Government assistance: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मिळणार 1000 कोटींची मदत,19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार लाभ

जुलै ते 22 ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी आणि संततधार पावसामुळे राज्यातील 43 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Advertisement

राज्य सरकारने ‘एसडीआरएफ’च्या माध्यमातून आतापर्यंत 4 हजार 900 कोटी रुपयांची मदत दिली आहे. आता ऑक्टोबरमध्ये बाधितांना सरकारकडून 1000 कोटींची मदत (Government assistance) मिळणार आहे. मान्सून हंगामाच्या सुरुवातीला, जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. परंतु, जुलैपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे 26.22 लाख हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत.

त्यानंतर सतत पाऊस पडला आणि साडेपाच लाख हेक्टरमध्ये उगवलेले पीक काळवंडले. त्याचबरोबर गोगलगायींमुळे 73 हजार हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त झाले. सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला 2,37,000 हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त झाले. आता पावसाने मार्ग सोडल्याने रब्बीला सुरुवात झाली होती.

Advertisement

कांद्यासह ज्वारी, हरभरा, मका, गहू लागवड सुरू; मात्र वरुणराज पुन्हा कोसळले आणि 1 ते 22 ऑक्टोबर दरम्यान 644,000 हेक्टर पिके वाहून गेली.
शेतात गुडघाभर पाणी असल्याने रब्बीच्या पेरण्या होत नसल्याची स्थिती आहे. दिवाळीत शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसान भरपाई देण्याच्या कडक सूचना सरकारने वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

त्याअंतर्गत आठ दिवसांत मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ‘एसडीआरएफ’ची रक्कम संपली, नैसर्गिक आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने सहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती.

Advertisement

जुलै ते सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना 4900 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. आता 19 जिल्हे विशेषत: बीड, नगरमध्ये ऑक्टोबरमधील पावसाने माघार घेतल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बाधित शेतकऱ्यांना (Government assistance) एक हजार कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत.

मदत व पुनर्वसन विभागातील सूत्रांनी सांगितले की, ‘एसडीआरएफ’ची संपूर्ण रक्कम थकल्याने सरकारला त्यासाठी पुन्हा तरतूद करावी लागणार आहे.

Advertisement

 

crop loan waiver : या बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची 964 कोटींची कर्जमाफी,34 हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ.

Advertisement

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page