KrushiYojanaबाजारभाव

शेतकऱ्यांसाठी खुशखबर : अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ कांदा मार्केट मध्ये कांदा 2100 रुपये क्विंटल,पहा कुठे मिळाला हा दर व आजचे कांदा बाजार भाव.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर : अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ कांदा मार्केट मध्ये कांदा 2100 रुपये क्विंटल,पहा कुठे मिळाला हा दर व आजचे कांदा बाजार भाव. Good news for farmers: Onion at ‘Ya’ onion market in Ahmednagar district at Rs. 2100 per quintal See where you got this price and today’s onion market price.

गेल्या काही महिन्यांपासून कांदा घसरण होत होती,शेतकरी कांदा दरात सुधारणा होण्याची वाट बघत होते परंतु दरात वाढ होत नव्हती, आज शनिवार दिनांक 11 जून 2022 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे राज्यात प्रसिध्द असलेले घोडेगाव कांदा मार्केट येथे तब्बल 377 ट्रक कांदा आवक झाली होती ही आवक एकूण 69851 गोणी इतकी होती, नंबर 1 क्वालिटीच्या कांद्यास या हंगामातील सर्वाधिक असा 2100 रुपये प्रती क्विंटलचा दर मिळाला आहे. एका आठवड्यात मोठ्या प्रमाणात भाव वाढ झाल्याने शेतकरी आनंदित झाले असून,दरात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले व भाव वाढ होत राहावी अशी भावना व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्यात प्रसिध्द असणारे हे घोडेगाव चे कांदा मार्केट मध्ये मागील वर्षी कांदा घेऊन येणाऱ्या गाड्यांची 5 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या प्रचंड आवक झाल्याने त्याचे व्हिडीओ संपूर्ण राज्यात सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कांदा आवक बद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते,मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख पाटील यांच्या नेतृत्वात काम करत असलेल्या नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपआवार घोडेगाव येथे या 2022 च्या हंगामातील  चांगला भाव मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी नामदार शंकरराव गडाख यांचे ही फोन वरून आनंद व्यक्त केला, तसेच देशपातळीवरील बाजार भाव ठरवनारे असे प्रसिद्ध घोडेगाव कांदा मार्केट व प्रसिद्ध व्यापारी आडतदार नेवासा तालुक्यात उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

बीड,औरंगाबाद,पैठण,वैजापूर,गंगापूर,अहमदनगर, राहुरी,शेवगाव,पाथर्डी,जालना यासह अनेक तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकरी विश्वासाने या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये येत असतात, आज 2100 रुपयांचा दर मिळाल्याने कांदा विक्री पावती सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या.

शनिवार पासून अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे,त्यामुळे कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांना अडचण होऊ शकते याचा परीणाम भाव वाढीवर होईल का हे पुढील सोमवारच्या मार्केट ला समजेल.

आज मिळालेले कांदा दर खालील प्रमाणे

कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा उपआवार घोडेगाव ता नेवासा जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र राज्य

दिनांक 11-6-2022
वार – शनिवार

एकुण कांदा गोणी आवक,
69851 गोणी
377 – गाडी
वजन – 37719 क्विंटल 54 किलो

नविन उन्हाळ गावरान कांदा कांद्याचे बाजार भाव,
एक दोन लाॅट- -1700 ते 2100
मोठा कलर पत्तिवाला,
1400 ते 1500
मुक्कल भारी–1100 ते 1300
गोल्टा-900- ते 1200.
गोल्टी–400 ते 800
जोड-200 ते 600
हलका डॅमेज कांदा-
100-ते 400.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!