आनंदाची बातमी: PM किसान योजनेचा 13 वा हप्ता लवकरच जारी होणार – जाणून घ्या संपूर्ण माहिती
आनंदाची बातमी: PM किसान योजनेचा 13 वा हप्ता लवकरच जारी होणार – जाणून घ्या संपूर्ण माहिती. Good News: 13th installment of PM Kisan Yojana to be released soon – know complete details
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेंतर्गत वार्षिक 6 हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये हस्तांतरित केले जातात. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता सरकारने 17 ऑक्टोबर रोजी जारी केला असून आता शेतकरी या योजनेच्या 13व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. शेतकरी बांधवांना हे जाणून घ्यायचे आहे की, या योजनेचा 2 हजार रुपयांचा 13 वा हप्ता आता कोणत्या दिवशी मिळणार आहे.