घोडेगाव कांदा मार्केटला ३८ हजार कांदा गोणी आवक, बाजारभावात २०० रुपयांची घसरण.
नेवासा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा उपआवार घोडेगाव येथे सोमवार दि.२६ डिसेंबर रोजी ३८२०९ कांदा गोणी आवक होऊन, बाजार भावात मागील बाजाराच्या तुलनेत २०० रुपये प्रतिक्विंटल इतकी घसरण झाली.
सोमवारच्या लिलावासाठी एकूण २०६ ट्रक कांदा आवक झाली होती, यामध्ये ३०५६५ गोणी उन्हाळी जुना कांदा होता व ७६४४ गोणी लाल कांदा विक्री साठी आला होता.
यामध्ये जुना उन्हाळी कांद्यास २०० रुपयांपासून २०५० रुपयांपर्यंत दर मिळाला तर लाल कांद्यास ८०० रुपयांपासून २१०० रुपयांपर्यंत दर मिळाला. कांदा मार्केटमध्ये आवक वाढत आहे,नवीन लाल कांदा आवक सुरू झाली असून पुढील १५ दिवसात आवक आणखी वाढेल असा व्यापारी सांगत आहेत.
आजचे कांदा बाजार भाव
उन्हाळ गावरान कांदा बाजार भाव
एक दोन लाॅट- -2400 ते 2500
मोठा कलर पत्तिवाला,
1900 ते 2050
मुक्कल भारी–1000 ते 1800
गोल्टा-700- ते 900.
गोल्टी–300 ते 700
जोड-300 ते 400
हलका डॅमेज कांदा-
200-ते 300
नविन लाल कांदा बाजार भाव.
गोल्टि-800 ते 1000
गोल्टा 1200 ते 1500
मुक्कल भारी-1600 ते 1900,
मोठा कलर पत्तिवाला- 2000 ते 2100.
एक दोन लाॅट-2200 ते 2600.