Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the fast-indexing-api domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/krushiyo/public_html/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the health-check domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/krushiyo/public_html/wp-includes/functions.php on line 6121
गाई व म्हैस गोठा अनुदान योजना 2022 | 77000 रुपये अनुदान मिळणार | असा करा अर्ज - krushiyojana.com
Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

गाई व म्हैस गोठा अनुदान योजना 2022 | 77000 रुपये अनुदान मिळणार | असा करा अर्ज

गाई व म्हैस गोठा अनुदान योजना 2022 | 77000 रुपये अनुदान मिळणार |Sharad Pawar Gramsamruddhi Yojana | gay mhais gotha ​​anudan yojana 2022 / Sharad pawar gram samrudhi yojana

Cow and buffalo herd grant scheme 2021 | A grant of Rs. 77000 will be given

टीम कृषी योजना / Krushi Yojana 

महाराष्ट्र राज्य सरकारने 3 फेब्रुवारी 2021 रोजी जाहीर केलेल्या योजनेनुसार “शरद पवार ग्रामसमृद्धी’ योजना सुरू केली आहे. सदर योजना राबविण्या साठीची प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. या योजनेतून शेतीला जोड उद्योग ठरलेल्या शेळी, कुक्कुटपालन, गाय-म्हैस पालन करणाऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे.शेतकरी बांधवांना या योजनेतून चांगला फायदा होऊ शकेल.

काही नव्या जुन्या योजनांच्या एकत्रीकरणातून ‘शरद पवार ग्रामसमृद्धी योजना’ राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांच्या वैयक्तिक लाभाच्या चार कामांसाठी अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये पहिली योजना आहे गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधणे. तर आपण आज जाणून घेणार आहोत या योजने संदर्भात सविस्तर माहिती ,योजनेचे स्वरूप व अर्ज कसा व कुठे करावा याबाबत ची सर्व माहिती.

शेतकऱ्यांना मिळणार 77000 रुपये अनुदान.

गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधकाम : यात दोन ते सहा गुरांसाठी एक गोठा बांधता येईल. त्यासाठी 77,188 रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे. सहापेक्षा अधिक गुरांसाठी सहाच्या पटीत म्हणजे 12 गुरांसाठी दुप्पट, 18 पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदान मिळणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे.

सुरवातीला तुम्ही सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्यापैकी कुणाकडे अर्ज करत आहात, त्यांच्या नावावर बरोबरची खूण करा.

त्याखाली ग्रामपंचायतचे नाव, तालुका, जिल्हा टाकायचा आहे. उजवीकडे तारीख टाकून फोटो चिकटवा.

त्यानंतर अर्जदाराचे नाव, पत्ता, तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक टाका.

आता तुम्ही ज्या कामासाठी अर्ज करणार आहात, त्या कामासमोर बरोबरची खूण करा.

येथे मनरेगा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कामांची यादी आहे. पण, आपल्याला शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेसाठी अर्ज करायचा असल्याने नाडेप कंपोस्टिंग, गाय- म्हैस गोठ्यांचं कॉंक्रिटीकरण, शेळी पालन शेड, कुक्कुटपालन शेड यापैकी तुम्हाला ज्या कामासाठी अनुदान हवे आहे त्या कामासमोर बरोबरची खूण करा.

इथे प्रत्येक कामासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे.

त्यानंतर तुमच्या कुटंबाचा प्रकार निवडा. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्‍या जमाती, भटक्‍या विमुक्त जमाती, दारिद्य्र रेषेखालील कुटुंब, महिलाप्रधान कुटुंब, शारीरिक अपंगत्व प्रधान असलेले कुटुंब, भूसुधार आणि इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी, 2008च्या कृषी कर्जमाफी योजनेनुसार अल्पभूधारक किंवा सीमांत शेतकरी यापैकी ज्या प्रकारात तुमचं कुटुंब बसत असेल त्यासमोर बरोबरची खूण करा.

तुम्ही जो प्रकार निवडाल त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावाही त्यासोबत जोडा.

लाभार्थींच्या नावे जमीन आहे का, असल्यास “हो’ म्हणून सातबारा, आठ-अ आणि ग्रामपंचायत नमुना 9 जोडा.

रहिवासी दाखला जोडा तसेच तुम्ही निवडलेले काम तुम्ही रहिवासी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत आहे का, तेही भरा.

अर्जदाराच्या कुटुंबातील 18 वर्षांवरील पुरुष, स्त्री आणि एकूण सदस्यांची संख्या लिहा.

शेवटी घोषणापत्रावर नाव लिहून सही किंवा अंगठा द्या.

सोबत मनरेगाचे जॉब कार्ड, 8-अ, सात-बारा उतारे आणि ग्रामपंचायत मालमत्ता नमुना 8-अ चा उतारा जोडा.

यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे. यासोबत सरपंच आणि ग्रामसेवकांच्या सहीचे एक शिफारसपत्र द्यावे लागणार आहे. यात लाभार्थी सदर कामाचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याबाबत सांगण्यात येईल.

या नंतर तुमच्या कागदपत्रांची छाननी केली जाईल व तुम्हाला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सही- शिक्‍क्‍यानुसार पोचपावती दिली जाईल. यात तुम्ही लाभासाठी पात्र आहात की नाही ते नमूद केले जाईल.

तुम्ही मनरेगाचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल; पण तुमच्याकडे मनरेगाचे जॉब कार्ड नसेल तर मात्र तुम्हाला आधी ग्रामपंचायत कार्यालयात जॉब कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.

सदर योजने बाबत ची माहिती आवडल्यास ही बातमी तुमच्या मित्रांना व शेतकरी बांधवांना पाठवा. विविध शासकीय योजना,हवामान माहिती,बाजार भाव जाणून घेण्यासाठी आमच्या वेब साईट ला भेट देत जा.

टीप – योजनेचा कोठा पूर्ण झाल्यास योजना काही कालावधी साठी बंद असू शकते तर काही जिल्ह्यापुर्ती मर्यादित सुरू अथवा बंद असू शकते. आमचा हेतू निव्वळ आपणास माहिती देण्याचा आहे.

शेतकरी योजना बाबत अधिक माहितीसाठी खालील माहिती वाचा.

गाई व म्हैस गोठा अनुदान योजना 2022 | 77000 रुपये अनुदान मिळणार. Cow and buffalo herd grant scheme 2022 | A grant of Rs. 77000 will be given | gay mhais gotha ​​anudan yojana 2022 / Sharad pawar gram samrudhi yojana

28 thoughts on “गाई व म्हैस गोठा अनुदान योजना 2022 | 77000 रुपये अनुदान मिळणार | असा करा अर्ज”

    • कृषी योजना या वेब साईट ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद

      Reply
    • कृषी योजना या वेब साईट वर भेट दिल्या बद्दल धन्यवाद

      Reply
  1. माझे नाव आपपसाहेब पाटील आहे मी एक शेतकरी आहे मला माझ्या गाय बैला साठी गोठयाची आवश्यकता आहे

    Reply
    • नक्कीच आम्ही आपली मदत करू…
      आपल्याला गोठा प्रकरण करायचे असेल तर त्या बाबतची सर्व माहिती आम्ही यापूर्वी आपल्या वेब साईट वर दिलेली आहे.

      Reply
  2. गाय म्हैस गोठा अनुदान योजना आम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी आमचं सहमती आहे

    Reply

Leave a Reply

Don`t copy text!