गणपती बाप्पा पावले, कापसाला मिळाला 16 हजारांचा भाव,कुठे मिळाला उच्चांकी दर,जाणून घ्या.

Cotton got the price of 16 thousand, where did you get the highest rate, know.

गणपती बाप्पा पावले, कापसाला मिळाला 16 हजारांचा भाव,कुठे मिळाला उच्चांकी दर,जाणून घ्या. Cotton got the price of 16 thousand, where did you get the highest rate, know.

cotton Price 2022 : कापूस हंगाम 2022 – 23 ची सुरुवात झाली आहे,राज्यातील अनेक शेतकरी आपला पहिल्यांदा तोडणीला आलेला कापूस वेचणी सुरू करून बाजार समिती मध्ये विक्रीसाठी घेऊन जात आहेत,अश्याच एका बाजार समिती मध्ये विक्री साठी आणलेल्या कापसास गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर देशातील सर्वाधिक उच्चांकी दर मिळाला असून हा दर आहे प्रती क्विंटल 16000 ( 16000 market price for cotton ) रुपये, होय तुम्ही वाचत असलेली ही बातमी 100 टक्के खरी आहे. जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर कापूस खरेदी केंद्रांची सुरुवात झाली,याच मुहूर्तावर बळीराजास बाप्पा पावला असून जिल्ह्यातील बोदवड या ठिकाणी कापसाला 16 हजार रुपये प्रती क्विंटल इतका सर्वाधिक दर मिळाला, तर सातगाव डोंगरी, ता.पाचोरा या ठिकाणी 14 हजार 772 रुपये क्विंटल असा उच्चांकी दर मिळाला.

पांढऱ्या सोन्याचे आगार म्हणून ओळख असलेल्या बोदवड तालुक्यामध्ये बुधवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी कापूस खरेदीस सुरुवात झाली, श्री गणेश स्थापनेचा शुभमुहूर्तावर खरेदी सुरू झाली त्यामध्ये सोळा हजारांचा भाव मिळाला यावर्षीची कापसाची सुरुवात जबरदस्त व आज पर्यंतची सर्वाधिक उच्चांकी झाली. याठिकाचे कापूस व्यावसायिक व खरेदीदार श्री वैष्णवी ट्रेडर्सचे संचालक राजू वैष्णव यांनी कापूस खरेदीचा श्री गणेश केला. त्यात 16 हजार रुपये प्रती क्विंटलचा (16000 market price for cotton) भाव मिळाला.

जिल्ह्यातील सातगाव डोंगरी, ता. पाचोरा याठिकाचे कापूस व्यापारी बाळू शंकर वाघ व श्री ज्ञानेश्वर शंकर अमृतकर या खरेदीदारांनी 14 हजार 772 रुपये प्रती क्विंटल या बाजारभावाने कापूस खरेदी केला. जिल्ह्यातील धरणगाव येथील श्री जिनिंग मिल मध्ये नवीन कापूस खरेदी सुरु करण्यात आली.या वेळी प्रथम मुहूर्ताचा कापूस दर 11 हजार 153 रुपये मिळाला. कापूस खरेदीच्या प्रथम दिवशीच्या शुभ मुहूर्तावर तब्बल एक हजार क्विंटल कापसाची खरेदी झाल्याची माहिती आहे.

धरणगाव तालुक्या मध्ये जिनिंग व्यवसायात श्री गणेश प्रतिस्थापणेच्या शुभ मुहूर्तावर कापूस खरेदीस सुरुवात करण्यात आली. याशिवाय बाळद तालुका पाचोरा व कासोदा तालुका एरंडोल व कजगाव तालुका भडगाव याठिकानीही कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे.

श्री गणेश चतुर्थीच्या दिनी कापूस खरेदी केंद्रावर असा मिळाला दर
(दर – क्विंटलप्रमाणे)

  • सातगाव डोंगरी – 14,772 – रुपये प्रती क्विंटल
  • बोदवड : 16,000 रुपये प्रती क्विंटल
  • बाळद : 11,551 रुपये प्रती क्विंटल
  • धरणगाव :  11,153 रुपये प्रती क्विंटल
  • कासोदा : 11,011 रुपये प्रती क्विंटल
  • कजगाव : 11,000 रुपये प्रती क्विंटल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page