शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार, एक महिन्यात कांद्याच्या भावात होणार मोठी वाढ, पहा तज्ञांचा कांदा भाववाढीचा अंदाज. Farmers’ Diwali will be sweet, there will be a big increase in onion prices in a month, see experts’ prediction of onion price increase
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे येत्या दिवाळीनंतर कांद्याच्या भावात दरवाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कांद्याचे दर स्थिर होते तर गेल्या पंधरा-वीस दिवसापासून कांदा दरामध्ये घसरन सुरू झाली होती.परंतु येत्या एक महिन्यात शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांच्या आशा पल्लवीत झाली आहे, शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
महाराष्ट्र व शेजारील राज्यात अनेक बाजार समितीमध्ये काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या कांद्याला अतिशय कमी भाव मिळत होता नंबर एक कांदा पंधरा ते सोळा रुपयांपर्यंत विक्री होत होता. ऍव्हरेज कांद्यास दहा ते बारा रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत होता. यामध्ये शेतकऱ्यांना त्यांचा खर्चही निघत नव्हता, सध्या राज्यात सुरू असलेला पाऊस व उन्हाळी कांद्यास जवळपास आठ ते दहा महिन्यांचा काळ होत आलेला असल्याने कांदाही टिकत नाहीये, अशा दुहेरी संकटात सापडलेला बळीराजास भाववाढ झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळू शकतो. परंतु अनेक शेतकऱ्यांकडे आता कांदा शिल्लक राहिलेला नाही.
सध्या घाऊक बाजारामध्ये कांद्यास दहा ते पंधरा रुपये पर्यंत भाव मिळत आहे व किरकोळ बाजार मध्ये 20 ते 30 रुपये किलो पर्यंत कांद्याची विक्री होत आहे.
कर्नाटक राज्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे काढणीला आलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र देखील होत असलेला मुसळधार पाऊस व कांदा चाळीमधील कांदा मोठ्या प्रमाणामध्ये खराब होत आहे.
यामुळे दिवाळीपर्यंत कांदा टिकेल अशी शक्यता कमी आहे, नवीन कांदा नोव्हेंबर पर्यंत बाजारात दाखल होईल परंतु सध्या वरील सर्व बाबी लक्षात घेता, दसरा दिवाळीत कांद्याचे भाव वाढतील असा तज्ञांचा अंदाज आहे.
काय आहेत भाववाढीची कारणे
महाराष्ट्रातील कांद्यास दक्षिण आणि उत्तर भारतात मागणी असते.महाराष्ट्र व शेजारील राज्यात मुसळधार पावसामुळे कर्नाटकात नव्याने काढणीस आलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महाराष्ट्रा मध्ये कांद्याचे पीक नोव्हेंबरपर्यंत येण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरात या राज्यात यंदा अधिक प्रमाणात कांद्याची लागवड आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कांद्याची गुणवत्ता व प्रतवारी चांगली आहे. पितृपक्ष संपल्यावर दसरा-दिवाळीचे सण सुरू होताय, याकाळात कांद्याची मागणी अधिक प्रमाणात वाढते.येत्या 1 महिन्यात महाराष्ट्रात कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये कांद्याच्या दरात वाढ होणार असल्याची खात्रीशीर माहिती तज्ञ देत आहेत. यामुळे येत्या 1 महिन्यात कांदा 15 ते 20 रुपयांची दरवाढ होण्याची शक्यता आहे.
भाववाढ झाली तरीही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच
महाराष्ट्रात शेतकऱ्यांकडे कांदा चाळीत साठवलेल्या कांद्यास आता सहा ते आठ महिन्याहुन अधिकचा कालावधी ओलांडला आहे, अधिक पाऊस व कांद्याची साठवण क्षमता संपत चालली आहे, कांदा खराब होत असल्यामुळे लहान शेतकऱ्यांनी कांदा यापूर्वीच विक्री केला आहे, यामुळे शेतकऱ्यांना भाववाढ झाली तरी पदरी निराशाच येण्याची शक्यता आहे.