crop loan waiver : या बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची 964 कोटींची कर्जमाफी,34 हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ.

crop loan waiver : या बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची 964 कोटींची कर्जमाफी,34 हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ.
crop loan waiver / भूविकास बँकेकडून कर्ज घेतलेल्या 34,788 कर्जदार शेतकऱ्यांना 964 कोटी 15 लाख रुपयांची संपूर्ण कर्जमाफी आणि ही रक्कम भूविकास बँकेच्या(crop loan waiver) शासकीय थकीत रकमेशी जुळवून घेण्यास झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या घेतलेल्या निर्णयामुळे राज्यभरातील सुमारे 69 हजार हेक्टर शेतजमिनीवर असणारा भूविकास बँकेला कर्जाचा बोजा कमी होणार.
तसेच राज्यातील सर्व भूविकास बँकांमधील सेवानिवृत्त तसेच कार्यरत व कंत्राटी कर्मचाऱ्यांची एकूण थकबाकी अदा करण्यात येणार असल्याने या सर्व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय 24 जिल्ह्यांतील भूविकास बँकांच्या 40 मालमत्ता सहकार विभागाने संपादित केल्या आहेत.
विभागाला या जिल्ह्यांमध्ये भाड्याच्या जागेत प्रादेशिक कार्यालयांसाठी जागा मिळेल आणि ही कार्यालये भाड्याने घेण्याच्या खर्चात मोठी बचत होईल.
याशिवाय भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांचे 275.40 कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी ही रक्कम शासनामार्फत देण्यास सहकार आयुक्त व निबंधक यांनी मान्यता दिली.
अशा रकमेसाठी भूविकास बँकेचे रु. 515.09 कोटी रुपयांच्या एकूण 55 मालमत्तांपैकी सुमारे 40 मालमत्ता सहकार विभागाच्या परिमंडळ स्तरावरील कार्यालयांसाठी सहकार विभागाकडे हस्तांतरित केल्या जाणार आहेत. 7 मालमत्ता संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तांतरित केली जाईल. 4 मालमत्तांबाबत न्यायालयात याचिका दाखल असल्याने त्यांच्या आदेशानुसार पुढे जाण्यास परवानगी देण्यात आली.
त्याचवेळी उच्च न्यायालयाने सांगली भूविकास बँकेच्या लिक्विडेशनच्या आदेशाला स्थगिती देत या बँकेच्या 4 मालमत्ता संबंधित बँकेकडे ठेवण्यास परवानगी दिली होती. शिखर भूविकास बँकेचे शासकीय रोखे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील मुदत ठेवीची संपूर्ण रक्कम (व्याजासह) शासनाकडे हस्तांतरित केली जाईल.
One Comment