Cotton Rates Today: कापसाच्या दरात मोठी उलथापालथ; कापूस बाजार गाठणार नवा उच्चांक. Cotton Rates Today: Big Upheaval in Cotton Rates; Cotton market will reach a new high
नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस बाजारामध्ये मोठी उलथापालथ झाली असून, गेल्या दोन दिवसापासून कापसाच्या दरात देशांमध्ये मोठी वाढ होत आहे.कापूस भाव वाढ होण्याचे कारण जरी अद्याप अस्पष्ट असले तरी होणाऱ्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. आज आपण देशातील काही प्रमुख बाजार समितीमध्ये झालेली एकूण आवक व मिळालेला किमान दर व कमाल दर बघणार आहोत.
गुजरात राज्यातील बागसरा मंडी मध्ये कापसाला सर्वाधिक 8400 प्रतिक्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला आहे, चोटीला बाजार समितीमध्ये किमान दर 7000 रुपये तर कमाल दर हा 8200 इतका मिळाला आहे. धोराजी बाजार समितीत किमान दर 7255 तर कमाल दर 8255 रुपये इतका मिळाला आहे. जसदान बाजार समिती मध्ये किमान दर 7875 रुपये क्विंटल तर कमाल दर हा 8400 रुपये इतका मिळाला आहे. सर्वाधिक दर हा ढोल मंडी मध्ये मिळाला आहे, या मंडी मध्ये 57.8 टन इतक्या कापसाची आवक झाली होती, त्यामध्ये किमान दर 7000 रुपये क्विंटल व कमाल दर हा 8500 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे.
आजचे कापूस बाजार भाव
( Kapus Mandi Bhav Today)
गुजरात मंडी | आवक (टन मध्ये) | किमान दर (रु./क्विं.) | कमाल दर (रु./क्विं.) |
बागसरा | 19.3 | 7250 | 8400 |
बोडेली | 251.94 | 7451 | 7950 |
चोटिला | 40 | 7000 | 8200 |
दीसा(भीलड़ी) | 0.2 | 7000 | 7700 |
धोराजी | 25.7 | 7255 | 8255 |
ढोल | 57.8 | 7000 | 8500 |
हलवाद | 124.8 | 7505 | 8255 |
जम्बूसर | 0.1 | 7200 | 7800 |
जम्बूसर (कावि) | 1 | 7600 | 8000 |
जसदान | 100 | 7875 | 8400 |
मनसा | 5.26 | 6555 | 8280 |
मोडासा | 5 | 7500 | 7750 |
मोरबी | 70 | 7750 | 8300 |
राजकोट | 320 | 7800 | 8350 |
सिद्धपुर | 36.4 | 7200 | 8370 |
थारा | 317 | 7450 | 8035 |
थारा(शिहोरी) | 15 | 7600 | 8010 |
वंकानेर | 60 | 6750 | 8410 |
शेतकरी मित्रांनो तुमच्याकडील कापूस विक्री करण्यापूर्वी बाजार समितीमध्ये खात्री करूनच खरेदी विक्रीचे व्यवहार करावा सध्या बाजार हे अस्थिर असल्यामुळे दररोज कापूस दरामध्ये चढ-उतार होत आहे.