Cotton Prices: महाराष्ट्रातील ‘या’ बाजार समितीत नवीन कापसाला मिळाला 7500 रुपये दर, कुठे भेटला हा दर जाणून घ्या.
Cotton Rates : मानवत बाजार समितीत पाडव्यानिमित्त हंगामी कापूस खरेदी सुरू झाली.
मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (दि. 16) कापसाला किमान 7 हजार 100 ते कमाल 7 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल तर सरासरी 7 हजार 450 रुपये भाव मिळाला.
कापूसची प्रमुख बाजारपेठ असलेल्या मानवत (जिल्हा परभणी) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त या हंगामासाठी नवीन कापूस खरेदी मंगळवारी (दि. 14) सुरू झाली.
मंगळवारी (14) हजार 700 क्विंटल कापसाची आवक झाली. त्यावेळी प्रति क्विंटल किमान दर 7,100 ते कमाल 7,425 रुपये आणि सरासरी दर 7,300 रुपये होता. बुधवारी (दि. 15) कापसाची 450 क्विंटल आवक झाली असून किमान 7 हजार 100 ते कमाल 7 हजार 479 रुपये प्रतिक्विंटल तर सरासरी 7 हजार 350 रुपये भाव मिळाला.