कांद्याच्या भावात मोठी वाढ; आज कांदा विकला 2500 रुपये क्विंटल , कुठे मिळाला हा भाव, जाणून घ्या.

Advertisement

कांद्याच्या भावात मोठी वाढ; आज कांदा विकला 2500 रुपये क्विंटल , कुठे मिळाला हा भाव, जाणून घ्या.

महाराष्ट्रात शेतकरी अनेक दिवसांपासून कांदा बाजारभाव वाढण्याची वाट पहात आहेत त्यांच्यासाठी आनंदवार्ता आहे, राज्यात आज झालेल्या कांदा लिलावात नंबर 1 कांद्यास दोन हजार पाचशे रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला आहे, शेजारील राज्य आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कांद्याच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले असल्यामुळे महाराष्ट्रातील उन्हाळी कांद्यास मागणी वाढली आहे.

Advertisement

आज महाराष्ट्र राज्यामधील विविध बाजार समितीमध्ये कांद्याचे भावात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव तालुका नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 303 ट्रक इतकी विक्रमी आवक झाली होती त्यामध्ये नंबर एक कांद्यास 2500 रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला आहे. कोल्हापूर बाजार समितीमध्ये 2200 रुपयांचा सर्वाधिक भाव मिळाला तर अकलूज बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये देखील आज प्रति 100 किलो कांद्यास तब्बल 2500 रुपयांचा विक्रमी भाव मिळाला आहे. पारनेर बाजार समितीमध्ये देखील एक क्विंटल कांद्यास 2100 रुपयांचा सर्वाधिक भाव मिळाला.

चला आज आपण पाहुयात आजचे महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव.

Advertisement

बुधवार दिनांक 28 सप्टेंबर 2022

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
28/09/2022
कोल्हापूर क्विंटल 2125 700 2200 1200
औरंगाबाद क्विंटल 733 125 1175 650
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 8205 1000 1600 1300
खेड-चाकण क्विंटल 1250 800 1400 1100
सातारा क्विंटल 65 1200 1700 1500
मंगळवेढा क्विंटल 3 1510 1630 1600
कराड हालवा क्विंटल 99 200 1800 1800
अकलुज लाल क्विंटल 215 400 2000 1500
सोलापूर लाल क्विंटल 5682 100 2500 1100
नागपूर लाल क्विंटल 1900 1000 1500 1375
साक्री लाल क्विंटल 11685 500 1550 1050
भुसावळ लाल क्विंटल 21 800 800 800
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 420 600 1800 1200
सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 1300 300 2200 1250
पुणे लोकल क्विंटल 6604 800 1800 1300
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 17 600 1200 900
कामठी लोकल क्विंटल 18 1300 1700 1500
संगमनेर नं. १ क्विंटल 496 1600 2251 1925
संगमनेर नं. २ क्विंटल 352 1000 1500 1250
संगमनेर नं. ३ क्विंटल 238 500 1000 750
नागपूर पांढरा क्विंटल 1000 1000 1500 1375
चंद्रपूर – गंजवड पांढरा क्विंटल 212 1300 1600 1400
येवला उन्हाळी क्विंटल 7000 170 1800 1100
येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 3000 200 1747 1150
नाशिक उन्हाळी क्विंटल 2150 350 1700 1200
लासलगाव उन्हाळी क्विंटल 74 2251 2450 2352
लासलगाव – निफाड उन्हाळी क्विंटल 2150 701 1400 1200
मालेगाव-मुंगसे उन्हाळी क्विंटल 9000 200 1500 1150
कळवण उन्हाळी क्विंटल 7800 250 2100 1400
पैठण उन्हाळी क्विंटल 1440 400 1300 800
चाळीसगाव उन्हाळी क्विंटल 1700 200 1351 980
चांदवड उन्हाळी क्विंटल 4200 700 1730 1000
मनमाड उन्हाळी क्विंटल 1550 400 1501 1200
सटाणा उन्हाळी क्विंटल 11685 250 1770 1250
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 14500 375 1855 1400
पिंपळगाव(ब) – सायखेडा उन्हाळी क्विंटल 4120 700 1500 1250
पारनेर उन्हाळी क्विंटल 1745 300 2100 1250
वैजापूर उन्हाळी क्विंटल 2529 500 1650 1200
देवळा उन्हाळी क्विंटल 4900 100 1500 1250
नामपूर उन्हाळी क्विंटल 10250 100 1805 1300
नामपूर- करंजाड उन्हाळी क्विंटल 6530 100 1800 1300

शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव पाहून कांदा विक्री करण्यापूर्वी नजीकच्या बाजार समितीमध्ये कांदा बाजारभावा बाबत खात्री करणे आवश्यक आहे.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page