Animal market: येत्या आठवड्याभरात जनावरांचे बाजार होणार सुरू, शासनदरबारी हालचालींना वेग.

Advertisement

Animal market: येत्या आठवड्याभरात जनावरांचे बाजार होणार सुरू, शासनदरबारी हालचालींना वेग. Animal market: The animal market will start in the next week, speed up the movement in the government court.

लम्पी स्कीन या आजारामुळे (Lumpy Skin Disease) मागील 2 ते 3 महिन्यांपासून राज्यातील जनावरांचे बाजार बंद आहेत. बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, पशुधनाची विक्री करता येत नसल्याने अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असून जनावरांच्या व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. बाजार बंद मुळे ग्रामीण भागातील अर्थकारण मंदावले आहे.परंतु आता शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, येत्या चार दिवसांत राज्यातील जनावरांचे बाजार सुरू होणार आहेत. जनावरांना होणाऱ्या लम्पी स्कीन या आजाराचे प्रमाण अनेक ठिकाणी आटोक्यात आले आहे. बहुतांश जनावरांचे लसीकरण पूर्ण झाल्याने प्रत्येक जिल्हाअनुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने जनावरांच्या बाजाराला परवानगी दिली जाणार आहे. जनावरांचे बाजार सुरु करण्यासंदर्भातील परिपत्रक काढण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने राज्याच्या विधी व न्याय विभागास फाइल दिली आहे, पुढील 2 दिवसांत बाजार सुरू करण्यासंर्भातील परिपत्रक निघेल अशी माहिती आहे.

Advertisement

जनावरांना होणाऱ्या ‘लंपी स्किन’ या रोगाचा प्रसार अधिक वेगाने होत असल्या कारणास्तव सप्टेंबर महिन्यातील 8 तारखेपासून राज्यात जनावरांच्या वाहतुकीवर बंदी आली. बाजार बंद व वाहतुकीवरील निर्बंध यामुळे जनवारांच्या खरेदी- विक्रीचे व्यवहार संथ झाले होते. ग्रामीण भागात खेडोपाडी,वाड्या वस्त्यांवर व्यवहार होत होते परंतु खरेदीसाठी ग्राहक व व्यापाऱ्यांची संख्या नगण्य होती. ऊस तोडणी सुरू होण्यापूर्वी बैल खरेदीसाठी मागणी वाढली परंतु बैलांच्या खरेदी विक्रीमुळे विविध ठिकाणी ‘लम्पी’चा प्रसार वेगाने झाला होता. बाधित जनावरांना होणारा औषध उपचारांचा मोठा खर्च व जनावरे दगावण्याची शक्यता यामुळे व्यापारी देखील हवालदिल झाले होते,बाजारबंद व लंम्पी मुळे खरेदीविक्री थंडवल्याने व्यापाऱ्यांना मोठी झळ बसत होती.

लंम्पी हा आजार म्हशीला होत नसल्याने बाजार सुरू करून किमान म्हशींची खरेदी विक्री सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी मंत्र्यांकडे व सरकारदरबारी केली जात होती. वाहतूक बंदी असल्या कारणाने म्हशींच्या खरेदी विक्रीला फटका बसत होता. शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना म्हैस खरेदी विक्री करण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

Advertisement

परंतु आता पशुसंवर्धन आयुक्तालय कार्यालयाकडे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर निवेदने येत होती.बाजार सुरू करण्याबाबत मागणी जोर धरू लागली होती, येणाऱ्या निवेदनांच्या पार्श्‍वभूमीवर ‘लम्पी’ आजाराच्या परिस्थितीचा आढावा घेऊन निवेदन व जनावरांची आकडेवारी बघता राज्यातील दोन लाख 21 हजार 826 बाधित जनावरांपैकी 1 लाख 52 हजार 114 जनावरे औषध उपचाराने बरी झाली आहेत. यामुळे जनावारांचे बाजार सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव पशुसंवर्धन विभागाकडून तयार करण्यात आला आहे.

अहमदनगर,अकोला,धाराशिव,धुळे,औरंगाबाद,जळगाव,बीड,सांगली,नंदुरबार, कोल्हापूर, वाशीम, जालना, हिंगोली, व मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील जनावरांचे लंम्पीचे लसीकरण पूर्ण झालेले आहे.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page