Agriculture Electricity: राज्यात ‘शेती वीज बिल’ थकबाकी न भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज कापण्याचे आदेश.

Agriculture Electricity: राज्यात ‘शेती वीज बिल’ थकबाकी न भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज कापण्याचे आदेश.
महावितरणची (Mahavitran) आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे वीजबिल न भरणाऱ्यांसाठी वसुली थांबवने हा पर्याय नसल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांची वीज खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे, महावितरणचे कार्यकारी संचालक विजय सिंघल यांनी सांगितले.
नागपुर मध्ये सिंगल यांनी शुक्रवारी (ता. 25) महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीस प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके, पुष्पा चव्हाण, राजेश नायक, सुनील देशपांडे उपस्थित राहिले होते.
विजबिलाची थकीत बाकी हाच मुख्य मुद्दा या बैठकीत अजेंड्यावर होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.यावेळी सिंघल म्हणाले, “कंपनीची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. कंपनीवर प्रचंड आर्थिक बोजा(कर्ज) आहे. नवीन कायद्यांमुळे कर्ज घेण्याची क्षमता खूप कमी झालेली आहे.
त्यामुळे कंपनीच्या अस्तित्वासाठी वीज बिल जमा करणे अत्यावश्यक झाले आहे. घरगुती ग्राहक व शेती ग्राहक यांचा थकीत विजबिलाचा आकडा खूप मोठा आहे, त्यामुळे थकीत विजबिलाच्या बाकीसाठी वीज कनेक्शन कापण्याशिवाय इतर पर्याय नाहीये.
सध्या बिले भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित न करण्याची सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे.चालू वीजबिल भरणाऱ्यांना सोडून इतरांचा शेताचा वीजपुरवठा बंद करा,असे आदेश देण्यात आले असल्याचे सिंघल यांनी सांगितले.