शेतकऱ्याचा नादच खुळा, 3 लाख 61 हजाराला घेतली बैलाची जोडी
शेतकऱ्याचा नादच खुळा, 3 लाख 61 हजाराला घेतली बैलाची जोडी. A pair of bullocks was bought for 3 lakh 61 thousand in Pathardi market
शेतकऱ्यांचा महत्वाचा समजला जाणारा बैल पोळा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला या पार्श्वभूमीवर आज पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीतील आठवडे बाजारात बैलांची मोठी खरेदी विक्री होत आहे.यानिमित्त एका शेतकऱ्याने आज पाथर्डी बाजारात 3 लाख 61 हजार रुपयांना उच्चांकी भावाने बैलाची जोडी खरेदी केली. पाथर्डी बाजारातून खरेदी केलेल्या बैलांना सजवण्यात आले, बैलाची डीजेच्या तालावर गुलालाची उधळण करत वाजत-गाजत मिरवणूक काढली. यावेळी ही मिरवणूक पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.