Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

Onion Prices: आठवड्यात कांदा हजारांनी घसरला, का घसरले बाजारभाव, जाणून घ्या

Onion Prices: आठवड्यात कांदा हजारांनी घसरला, का घसरले बाजारभाव, जाणून घ्या. Onion Prices: Onion fell by thousands in a week, know why market prices fell

Fall in onion prices|कांदा दरात घसरण| Todays Onion Prices| Onion Market Prices| राज्यातील कांदा बाजारभाव

दक्षिणेकडील राज्यात मागणी घटल्याचे परिणाम

कांद्याच्या दरात एका आठवड्यात 1 हजार रुपयांनी घसरण झाली आहे, नेवासा तालुक्यातील घोडेगाव बाजार समितीत 21 नोव्हेंबर रोजी 225 ट्रक कांदा आवक झाली होती. लिलावमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात 1 हजार रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत.

बाजार समिती मध्ये 41 हजार 803 कांदा गोणी आवक झाली होती, यात उन्हाळी कांदा सर्वाधिक होता, तीनशे गोणी नवीन लाल कांदा विक्रीसाठी आला होता या कांद्यास पाचशे रुपयांपासून 2 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला, जुना उन्हाळी कांदा दोनशे ते दोन हजार रुपयांपर्यंत विक्री झाला. क्वचित एक दोन वक्कल 2100 ते 2200 रुपयांना विक्री झाले.

दक्षिणेकडील राज्यात नवीन लाल कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे, सोलापूर बाजारसमितीत 30 ट्रक पर्यंत नवीन कांद्याची आवक होत असून, नोव्हेंबरमध्येही मध्यप्रदेश व महाराष्ट्रात जुना उन्हाळी कांदा अजूनही अधिक प्रमाणात उपलब्ध आहे,शेतकऱ्यांकडे मोठा साठा आहे,दक्षिणेकडून मागणी घटल्याने बाजार कमी होत असल्याचे बाजारभाव अभ्यासक सांगत आहेत.

घोडेगाव बाजार समितीत मिळालेले कांदा बाजारभाव

मोठा कांदा भारी – 1700 ते 1900
2 नंबर भारी कांदा – 1500 ते 1600
गोल्टा – 1000 ते 1350
गोल्टी – 500 ते 900
जोड कांदा – 300 ते 400
हलका कांदा – 200 ते 600

नवीन लाल कांदा – 500 ते 2000

संदर्भ – पुढारी

Leave a Reply

Don`t copy text!