राष्ट्रीय पशुधन अभियान : पशुपालन,कुक्कुटपालन, शेळीमेंढी पालन यासह विविध योजनांसाठी अर्ज सुरू; मिळेल 50 टक्के अनुदान.National Livestock Campaign: Application for various schemes including animal husbandry, poultry, goat and sheep rearing; Get 50 percent grant.
हे ही वाचा…
- घर खरेदीसाठी सरकारकडून मिळणार 2 लाख 50 हजार रुपयांचे अनुदान.
- पशुपालक क्रेडिट कार्ड योजना : गाई म्हैस खरेदीसाठी विनातारण मिळतील 1 लाख 80 हजार रुपये ; 15 फेब्रुवारीपर्यंत करा अर्ज.
सन 2021- 22 केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान ( National Livestock Mission ) सन 2021- 22 अंतर्गत पशुपालक , शेतकरी समूह गट , महिला बचत गट व उद्योजक तसेच पशुसंवर्धन विषयक व्यवसाय करणारे शेतकरी या साठी 50 % अनुदानावर विविध योजने अंतर्गत ONLINE पद्धतीने अर्ज करणे विषयी सूचित करण्यात येत आहे . सन 2021-22 केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियांना अंतर्गत तीन उप अभियान राबिवण्यात येत आहे सदर अभियानाचा उद्देश हा शेळी मेंढी , कुकूट पालन , वराह पालन क्षेत्र आणि वैरण विकास क्षेत्राचा विकास करून रोजगार निर्मिती करणे , उद्योजकता विकास करणे, पशुधनाच्या वंशावळीमध्ये सुधारणा करणे , वैरण व वैरणीची उपलब्धता वाढवून चारा बियाणे साखळी मजबूत करणे पशुपालकांना दर्जेदार विस्तार सेवा उपलब्ध करून देणेसाठी मजबूत यंत्रणा उभी करणे आणि कुकूट पालन , शेळी-मेंढी पालन , पशुखाद्य आणि वैरण या प्राधान्यकृत क्षेत्रामध्ये व्यावहारिक संशोधनाला प्रोत्साहन देणे हा आहे . सदर अभियान हे महत्वपूर्वक तीन उपअभियानावर आधारित आहे . आज आम्ही आपणास कृषी योजना डॉट कॉम च्या माध्यमातून ही माहिती देत आहोत,जेणेकरून आमच्या वाचकांना याचा लाभ घेता येईल.
1) पशुधन व कुकूट वंश सुधारणा उप अभियान
सदर उप अभियाना अंतर्गत ग्रामीण – कुकूटपालनातून प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकास करणेसाठी पशुपालकांना 50 % अनुदानावर कमीत कमी 1000 देशी पक्षी संगोपन व अंडी उबवणी केंद्राची स्थापना करणेसाठी , पशुपालकांच्या प्रकल्पानुसार 25 लक्ष पर्यत अनुदानाची रक्कम पशुपालकांना मिळणार आहे . या प्रकल्पासाठी लागणारी 50 % रक्कम पशुपालकाने बँकेकडून कर्ज रूपाने किंवा स्वतः उभी करणे अपेक्षित आहे . याच उपअभियाना अंतर्गत ग्रामीण- शेळी- मेंढी पालनातून प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकास करणेसाठी पशुपालकांना कमीत कमी 500 शेळी व 25 बोकड गट स्थापन करणे साठी 50 % भांडवली अनुदान पशुपालकांच्या प्रकल्पानुसार 50 लक्ष पर्यत अनुदानाची रक्कम मिळणार आहे या प्रकल्पासाठी लागणारी 50% रक्कम पशुपालकाने बँकेकडून कर्ज रूपाने किंवा स्वतः उभी करणे अपेक्षित आहे . सदर उप अभियाना अंतर्गत वराह पालनातून उद्योजकता विकास करणे साठी 100 मादी अधिक 50 नर वराह गट स्थापन करण्यासाठी पशुपालकांच्या प्रकल्पानुसार 30 लक्ष पर्यत अनुदान मिळणार आहे. पशुपालन क्षेत्रातील तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या उदयोजकांसाठी व शेळी -मेंढी वीर्य पिढीची स्थापना करणे तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या गायी -म्हशी यांच्या कृत्रिम रेतन केंद्रा मधून शेळ्या मेंढ्या मधील कृत्रिम रेतन उपक्रम वृंध्दीगत करणे , शेळ्या मेंढयाच्या वंशामध्ये अनुवांशिक सुधारणा करण्यासाठी विदेशातून जर्म प्लाझम आयात करण्यासाठी योजनेनुसार अर्थ साह्य मिळणार आहे . वराह मध्ये आनुवंशिक सुधारणा करण्यासाठी वराह वीर्यशाळा स्थापन करणे व विदेशातून जर्म प्लाझम करण्यासाठी सुद्धा अर्थ साह्य मिळणार आहे .
2) पशुखाद्य व वैरण विकास उप-अभियान
केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानातील पशुखाद्य व वैरण विकास या उपअभियाना अंतर्गत गुणवत्ता पूर्वक बियाणे उत्पादन व पशुखाद्य उद्योजकता विकास करणे या बाबींसाठी प्रकल्प किमतीच्या 50 % पशुपालकांच्या प्रकल्पानुसार 50 लक्ष पर्यत अनुदान मिळणार आहे या योजने मध्ये मुरघास बेल , वैरणीच्या विटा आणि टी .एम .आर निर्मितीसाठी दोन टप्यामध्ये SIDBI मार्फत अनुदान मिळणार आहे .
3 ) नावीन्य पूर्ण संशोधन व विस्तार उप- अभियान
सदर उपअभियाना अंतर्गत नाविन्यपूर्ण संशोधन व विकास , विस्तार उपक्रम , पशुधन विमा , यासाठी केंद्र व राज्य शासन अर्थ साह्य करणार आहे , अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र रेषेखालील पशुपालकांना 05 कॅटल युनिट ( शेळी -मेंढी , वराह व ससे वगळून ) साठी केंद्र व राज्य शासन अर्थ साह्य करणार आहे.
सदर योजने विषयीची सखोल माहिती करून घेणे साठी पशुसंवर्धन विभागाच्या www.ah.maharshtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळा भेट द्यावी किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुख , पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती यांचेशी संपर्क साधावा .योजेने साठी अर्ज भरताना योजनेविषयीपूर्ण माहिती करून घेऊन, प्रकल्प अहवाल व अनुषंगिक सर्व दस्तावेज जवळ ठवावेत . अर्ज करण्यासाठी htpps:// www.udymimitra.gov.in संकेतस्थळाला भेट द्यावी .
राष्ट्रीय पशुधन अभियान हे चांगले अभियान आहे. व या अभियाना मुळे शेतकरी यांना फार फायदा होणार आहे. या योजनात नविन शेतकरी फायदा घेवू शकतात का?
हो घेऊ शकतात
Kuktpaln
Sheli palan
1000 deshi pakshi sangipan
I will start goat farm and poultry farm