Punjab Dakh Havaman Andaj : या तारखेनंतर राज्यात पुन्हा पाऊस – पंजाब डख.Punjab Dakh Havaman Andaj: Rain again in the state after this date – Punjab Dakh
राज्यात 3 डिसेंबर पर्यंत भाग बदलत बदलत पाऊस पडणार असल्याचे अंदाज तंतोतंत खरा ठरला असुन उद्या दि.4 डिसेंबर पासुन हवामान कोरडे राहील असे पंजाब डख (panjab dakh patil) यांनी सांगितले.
हवामान विषयक माहिती देताना आज त्यांनी सांगितले की, राज्यात उद्या पासुन 8 डिसेंबर पर्यंत हवामान कोरडे राहणार आहे तर 9 डिसेंबर नंतर पुन्हा पाऊस पडणार आहे.
9,10,11 डिसेबंर ला काही जिल्हात भाग बदलत तुरळक भागात पडणार पाउस हा पाउस सर्वदूर नसेल.
माहितीस्तव – दि.4,5,6,7,8 डिसेंबर या तारखेत थंडी जाणवेल व 4 डिसेंबर ला धुई , धूके, धुराई येणार आहे. आपल्या पिकांचे नियोजन करावे.शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी .
9,10,11, डिसेबंर ला काही जिल्हात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे चंदपूर यवतमाळ नागपूर वर्धा अकोला अमरावती वाशिम बुलढाणा जळगाव औरंगाबाद जालना बिड परभणी हिगोंली नांदेड लातूर उस्मानाबाद सोलापूर सांगली नगर या जिल्हात तुरळक ठिकाणी पाऊस असेल.
गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या कमी अधिक प्रमाणातील पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागत असून पंजाब डंख यांच्या अंदाजाचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होत आहे.