कांद्याची दरवाढ: लवकरच कांद्याची किंमत दुप्पट होऊ शकते, जाणून घ्या काय आहे भाव वाढीची शक्यता.

Onion price hike: The price of onion may double soon, find out what is the possibility of price rise.

Advertisement

कांद्याची दरवाढ: लवकरच कांद्याची किंमत दुप्पट होऊ शकते, जाणून घ्या काय आहे भाव वाढीची शक्यता.Onion price hike: The price of onion may double soon, find out what is the possibility of price rise.

टीम कृषी योजना / Krushi Yojana

Advertisement

कांद्याच्या भावात दरवाढ होण्याची शक्यता निर्माण झाली असून,कांद्याचे दर वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पावसाळा आहे, ज्यामुळे कांद्याचे नवीन पीक विलंबाने होत आहे. क्रिसिल रिसर्चने दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान कांद्याचे दर उच्च राहन्याची शक्यता असून, 2018 च्या तुलनेत यंदा कांद्याच्या किमतीत 100 टक्के वाढ होऊ शकते असे या रिसर्च मध्ये नमूद करण्यात आले आहे.

कांद्याच्या कमी झालेल्या भावामुळे शेतकऱ्यांची घोर निराशा झाली होती,कांदा चाळीत साठवलेल्या कांद्यास मोठा खर्च करून देखील भाव वाढला नव्हता आता भाव वाढ झाल्यास शेतकऱ्यांना याचा आर्थिक लाभ होऊ शकतो तर कांद्याची किंमत पुन्हा एकदा ग्राहकांना रडवू शकते. येत्या काही दिवसांत कांदा अधिक महाग होऊ शकतो, अशी अपेक्षा आहे. कांद्याचे दर वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पावसाळा हे आहे, ज्यामुळे कांद्याचे पीक विलंबाने होत आहे. त्याचबरोबर, ताऊटे चक्रीवादळामुळे, कांद्याच्या बफर स्टॉकचा कालावधी देखील कमी करण्यात आला आहे, ज्यामुळे किमतींवरही परिणाम होईल. क्रिसिल रिसर्चने दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान कांद्याचे दर उच्च राहू शकतात. कांद्याचे दर कसे वाढतील याबाबत आपल्याकडे काही माहिती असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कळवा.

Advertisement

क्रिसिल रिसर्चच्या अहवालात म्हटले आहे की 2018 च्या तुलनेत कांद्याच्या किमतीत 100 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. खरीप 2021 मध्ये कांद्याचे दर 30 रुपये प्रति किलोच्या पातळीलाही ओलांडू शकतात. पावसाळ्यामुळे महाराष्ट्रात कांदा पिकाच्या लागवडीत समस्या आहे. अशा परिस्थितीत, अपेक्षित आहे की या वर्षी वर्ष-दर-वर्षाच्या आधारावर खरीप 2020 च्या तुलनेत 15 टक्क्यांनी कमी कांद्याचे उत्पादन होऊ शकते.

मान्सूनचा थेट परिणाम कांद्याच्या किमतीवर दिसून येत आहे. सर्वप्रथम, ऑगस्टमध्ये मान्सून चांगला नव्हता म्हणजे पाऊस खूप कमी होता. आता सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे समस्याही भेडसावत आहेत. कांद्याचे भाव जितके जास्त असतील तितके रोपण करण्यास विलंब होईल. मान्सूनचा कांद्याच्या उत्पादनावर परिणाम होईल आणि यामुळे खरीप कांद्याचे भाव वाढू शकतात.

Advertisement

कांद्याचे उत्पादन सर्वाधिक असलेल्या महाराष्ट्रातून मान्सूनमुळे कांदा काढणीस विलंब होऊ शकतो. 2018 च्या तुलनेत गेल्या वर्षी याच सणासुदीच्या काळात कांद्याचे दर जवळपास दुप्पट झाले होते. याचे मुख्य कारण म्हणजे आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मान्सूनमुळे कांद्याच्या खरीप पिकाचे खूप नुकसान झाले. कांद्याच्या पुरवठ्यातही समस्या होत्या.

Onion price hike: The price of onion may double soon, find out what is the possibility of price rise.

Advertisement

Related Articles

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page