Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

हवामान अभ्यासक पंजाब डख Panjab Dakh हवामान अंदाज | या आठवड्याचा नवा हवामान अंदाज | शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता

 

टीम कृषी योजना / Krushi Yojana

गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले हवामान अभ्यासक पंजाब डख यांचे सर्व अंदाज आज पर्यंत बऱ्याच प्रमाणात खरे ठरले आहेत. त्यांनी गेल्या वर्षी दिलेले सर्व अंदाज शेतकऱ्यांना पटले असून त्यांच्यावर अनेक शेतकरी विश्वास ठेवत आहेत. या वर्षात मान्सूनचे आगमन झाले असले।तरी पाऊसास सुरुवात झालेली नाहीये,काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला परंतु सर्वदूर पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी हवामान अभ्यासक पंजाब डख ( Panjab Dakh ) यांचा नवा अंदाज आज आला असून तो काय आहे आपण पाहूया.

पंजाब डख- विश्रांती घेतलेल्या वरुण राजाचे ठिकठिकाणी आगमण झाले आहे. उद्या पासून पाऊस वाढत जाणार आहे. राज्यात पाऊसाचे दणदणीत आगमण होणार व राहीलेली पेरणी या पावसावर पूर्ण होणार, तसेच पिकांना जिवदान भेटणार असे पंजाब डख यांचा अंदाज आहे.

राज्यात 6 ते 20 जुलै दरम्याण दररोज भाग बदलत धो-धो असा सर्वदूर पाऊस पडणार आहे.

शेतकरी बांधवांनी सर्तक रहावे या पाऊसाने ओढे,नदी,नाले वाहतील. छोटे छोटे तळे भरतील, असा पाऊस येईल.

राज्यात काही भागात मुसळधार पाउस पडणार ? 12 जुलै 13,14,15 व 16 जुलै या तारखेत पाऊस पडणार.

माहितीस्तव – राज्यात 6 जुलै पासून पावसाला सुरवात होईल. 7,8,9,10 व 11 तारखेस राज्यात सर्व भागात हजेरी लावेल. व 12,13,14,15,16,17 रोजी काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी वाहुनी पाऊस होईल. राज्यात कुठे अतिवृष्टी तर कुठे ढगफुटी होईल कुठे रिमझिम पाऊस होईल. 18 तारखे पर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे . या पावसावर सर्व शेतकऱ्यांची उर्वरित राहीलेली पेरणी पूर्ण होईल.दर वर्षी जुलै महिण्यात पाऊस कमी असतो पण यावर्षी जास्त पाऊस होईल. हा पाउस जास्त प्रमाणात पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क रहावे व स्वतःची तसेच पाळीव प्राण्याची काळजी घ्यावी.

1) पूर्वविदर्भ
2) मराठवाडा
3) प.विदर्भ
4) दक्षिण महाराष्ट्र
5) प.महाराष्ट्र
6) उत्तर महाराष्ट्र
7) कोकन पट्टी

या सर्व विभागा मध्ये दररोज भाग बदलत पाउस पडेल असा पंजाब डख ( Panjab Dakh )यांचा अंदाज आहे.

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे. शेवटी हे अंदाज आहे. वाऱ्यात बदल झाला कि वेळ ठिकाण बदलते असे पंजाब डख सांगतात.

Leave a Reply

Don`t copy text!