टीम कृषी योजना / Krushi Yojana
नुकतेच लॉकडाऊन उठल्यानंतर घोडेगाव ता-नेवासा जि-अहमदनगर येथील कांदा मार्केट सुरू झाले आहे त्यामुळे कांदा आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे.काल शनी दि 26 जुन 2021 रोजी घोडेगाव ता नेवासा ( Ghodegaon Onion Market ) येथील कांदा मार्केटला विक्रमी अशी 73 हजार 649 गोणी आवक झाली होती.मागील आठवड्यात याच मार्केटला राज्यात सर्वाधिक 417 ट्रक कांदा आवक एकाच दिवशी झाली ही आवक राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा मार्केटपेक्षा सर्वाधिक अशी होती.
कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा उपआवार घोडेगाव येथील कांदा मार्केटमध्ये (Ghodegaon Onion Market) कांद्याची प्रचंड आवक होत असून काल शनिवार दि 26 जून रोजी 73 हजार 649 गोण्या एवढी आवक झाली होती. घोडेगाव मार्केटमध्ये (Ghodegaon Onion Market) सोमवार, बुधवार व शनिवारी या तीन दिवशी कांदा लिलाव होत असतात. जून महिन्याच्या या आठवड्यात तीन लिलाव वार मिळून 2 लाख 9 हजार 519 गोणी इतकी प्रचंड आवक आली होती.
कांदा साठवणुकीची नवी पद्धत ; दोन वर्षे टिकतो कांदा | ‘या’ शेतकऱ्याने सांगितली नवीन पद्धत
सोमवारच्या लिलावात 65 हजार 622 गोण्या ,बुधवारच्या मार्केटला 70 हजार 248 गोण्या ,शनिवारच्या लिलावात 73 हजार 649 गोण्या आवक झाली होती.या तीन मार्केट ला मिळून 2 लाख 9 हजार 519 इतकी कांद्याची प्रचंड आवक झाली.
पाऊसाचे वातावरण,खरीपाची लगबग,कांदा साठवण्याची अडचण व कांदा खराब होण्याचे प्रमाण यामुळे घोडेगाव कांदा मार्केटला मोठ्या प्रमाणात कांदा आवक होत आहे. ( Ghodegaon onion market is getting a lot of onions )
घोडेगाव मार्केटचे कांदा भाव ( Onion prices of Ghodegaon market )
शनिवारी झालेल्या कांदा लिलावात उच्च दर्जाच्या मोठ्या मालाला 2100 ते 2200 रुपयांचा भाव मिळाला तर मोठ्या मालास 1700 ते 1900 रुपये भाव मिळाला,मध्यम मालास 1500 ते 1700 रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला,गोल्टी,गोल्टा कांद्यास 1000 ते 1500 रुपये भाव मिळाला तर काही ठराविक एक्स्पोर्ट क्वालिटी कांद्यास 2300 ते 2400 रुपये भाव मिळाला.
मार्केट सुरू झाल्यापासून कांद्याचे भाव टिकून आहेत,शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकरी खुश होत आहेत.उच्च प्रतीचा कांदा माल व योग्य व्यवस्थापन यामुळे देशभरातून कांदा खरीदीदार घोडेगाव कांदा मार्केट येथे कांदा खरेदीसाठी येतात ( Onion buyers from all over the country come to Ghodegaon Onion Market to buy onions )व प्राधान्य देतात त्यामुळे कांदयास नेहमी चांगला भाव मिळतो त्यामुळे शेतकरी बांधवांत नेहमी समाधानाचे वातावरण असते.पुढील महिन्यात कांदा भावात वाढ होईल अशी शक्यता कांदा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ( Onion traders have expressed the possibility of an increase in onion prices next month. )
मृद व जलसंधारण मंत्री ना शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव ता नेवासा येथे सुरू असलेल्या कांदा मार्केटमुळे घोडेगाव व नेवासा तालुक्यातील अर्थकारणाला मोठी गती मिळाली आहे. योग्य व्यवस्थापन यामुळे देशभरातून कांदा खरीदीदार घोडेगाव कांदा मार्केट येथे येतात सर्वाधिक कांदा आवक होणारे घोडेगावचे कांदा मार्केट आता देशभरात प्रसिध्द होत आहे.( Ghodegaon’s onion market, which receives the highest number of onions, is now becoming famous all over the country. )
2 thoughts on “अहमदनगर जिल्ह्यातील या कांदा मार्केट मध्ये 2 लाख कांदा गोण्यांची आवक ; मार्केट राज्यात ठरतंय अग्रेसर”