टीम कृषी योजना / Krushi Yojana
हवामान विभागाबरोबरच शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले हवामान अभ्यासक पंजाब डख Punjab Dakh weather forecast यांनी आज पर्यंत वर्तविलेले हवामानाचे अंदाज अचूक ठरत असल्याचे शेतकरी बांधव सांगतात त्यामुळे पंजाब डख यांच्या अंदाजाची शेतकरी आतुरतेने वाट बघत असतात. शेती करत असताना हवामानाच्या अभ्यासानुसार शेती करण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. आज आम्ही आमच्या वाचकांसाठी हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा हवामाना विषयीचा अंदाज घेऊन आलो आहोत. पाहू यात काय आहेत पंजाब डख यांचे अंदाज.
पंजाब डख सांगताहेत की राज्यात पुढील तिन दिवस म्हणजेच 20 , 21 व 22 जून रोजी हवामान हे कोरडे राहणार आहे.
23 व 24 जून रोजी पूर्वविदर्भ, मराठवाड्यातील तुरळक भागात जोरदार पाउस पडेल असा अंदाज आहे तर महाराष्ट्र राज्यात 25 , 26 व 27 जून रोजी हवामान कोरडे राहील. कोकण विभागात दररोज पाउस पडेल व राज्यात 28,29 व 30 जून आणि 1 व 2 जुलै रोजी पाउस पडेल असा अंदाज आहे.( Punjab Dakh weather forecast )
शेतकऱ्यांच्या महितीस्तव पंजाब डख सांगतात की हवामान हे कोरडे सांगीतले आहे तरी एखाद्या वेळेस स्थानिक वातावरण तयार होउन एखाद्या भागात पाउस पडू शकतो.
वर दिलेले अंदाज विभागानूसार आहेत गावानुसार असे पजाब डंख सांगतात.( Punjab Dakh weather forecast. )
दिलेल्या तारखेत एखादा दिवस मागे पुढे होण्याची शक्यता आहे तसेच वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे असे पंजाब डख सांगतात.
टीप – वरील अंदाज हे पंजाब डख यांनी वर्तविलेले असून आपण खात्री करून आपली शेती कामे करावीत.