बापरे, राज्यातील या जिल्ह्यात 24 तासांत 366 जनावरे लम्पीबाधित. 366 animals infected with lumpy in 24 hours in this district of the state
देशभरामध्ये जनावरांमध्ये आढळणारा लंपी या आजाराने महाराष्ट्रात थैमान घालायला सुरुवात केली आहे इतर जिल्ह्यात आढळणारा हा आजार आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे असाच महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 366 जनावरे ही लंबी बाधित झालेली आहे पशुसंवर्धन विभागाकडून ही धक्कादायक माहिती कळाली आहे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत मध्ये सर्वाधिक जनावरे ही संसर्ग बाधित झालेली असून कर्जत तालुक्यात 106 गावांमध्ये लंपी हा आजार पसरला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात गत 24 तासांत 366 जनावरांना लम्पीची बाधा झाली असून, त्यातील चार गायींचा मृत्यू झाला. आतापर्यंत 160 गावांत 1366 जनावरे लम्पीने आजारी पडलेली आहेत. 479 जनावरे बरी झाल्याची माहिती जिल्ह्यात पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय कुमकर यांनी दिली. दरम्यान, कर्जतमध्ये लम्पीचा उद्रेक झाला असून, तेथे बाधित जनावरांची संख्या 441 झाली आहे.
लम्पीने बाधित जनावरांची संख्या दररोज वाढती आहे. मंगळवारी जिल्ह्यात 997 जनावरे बाधित होती बुधवारी हा आकडा 366 ने वाढून 1366 इतका झाला आहे तर मृत्यूचा आकडा ही 39 पर्यंत वाढला आहे एकीकडे बाधित जाणारे वाढत असताना दुसरीकडे पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉक्टर सुनील तुंबारे,पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर संजय कुमकर, डॉक्टर माधुरी भिसे यांनी लसीकरण आणि उपचारासाठी यंत्रणा अलर्ट केली आहे बुधवार अखेर 5 लाख 66 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
पशुसंवर्धक विभागाकडून शेतकऱ्यांना फॉगिंग संदर्भात सूचना केल्या जात आहेत तसेच लक्षणे आढळल्यास तात्काळ शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात कळवावे असे आवाहनही पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.