आंब्याच्या एका झाडाला २२ प्रकारचे आंबे ; या शेतकऱ्याने केली ही किमया | लाखोंचे होतय उत्पन्न.

Advertisement

 

टीम कृषी योजना/Krushi Yojana

Advertisement

 

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने एकाच आंब्याच्या झाडाला २२ जातींचे आंबे घेण्याची किमया घडवली आहे.22 types of mangoes per mango tree.  काकासाहेब सावंत या शेतकऱ्यांने एकाच आंब्याच्या झाडावर २२ प्रकारच्या जातीचे आंबे घेतले असून यामध्ये केशर, हापुस, सिंधू, रत्ना, सोनपरी, नीलम, निरंजन, आम्रपाली, क्रोटोन, तैवान, लालबाग, दशेरी, राजापुरी, बेनिश, पायरी, बारोमाशी, वनराज, मलगोबा, मल्लिक्का, तोतापुरी अशा देशी आणि काही विदेशी आंब्याच्या जाती देखील आहेत.

Advertisement

एकाच आंब्याच्या झाडाला काकासाहेब सावंत यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ४४ कलम केली होते. यातील २२ कलम यशस्वी झाले व एकाच झाडाला २२ प्रकारचे आंबे लागले असून पंचकृषित या झाडाची व शेतकऱ्याची चर्चा होत आहे. यातील काही आंब्याचा तोडा झाला आहे. एकाच झाडाला २२ जातीच्या मिळून जवळपास ७०० आंबे लागले होते.22 types of mangoes per mango tree.

 

Advertisement

सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळग्रस्त भाग. याच तालुक्यातील अंतराळ या गावचे काकासाहेब सावंत यांनी नोकरी सोडून गाव गाठले आणि शेती सुरू केली. नंतर शासनमान्य श्री बनशंकरी नावाने नर्सरी सुरू केली. या तालुक्यातील शेती निसर्गाच्या कृपेवर अवलंबून आहे. असे असतानाही मोठ्या हिंमतीने काकासाहेब सावंतांनी नर्सरी सुरू केली. त्यांनी आयटीआयमधून डिप्लोमा केलेला आहे. त्यांचे कुटुंब आज नर्सरीच्या व्यवसायात चांगलेच स्थिरावले आहे. पुण्यातील अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये एक दशक, काम केल्यानंतर काकासाहेब सावंत आता एक नर्सरी चालवतात. त्यातून त्यांना वर्षाकाठी ५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. हे करत असताना सावंत यांनी ३ वर्षांच्या आंब्याच्या झाडावर प्रयोग केला होता.

हा यशस्वी प्रयोगा नंतर अनेक शेतकरी बांधवांना प्रेरणदाई ठरलेले सावंत यांच्या आंब्याच्या झाडाची व प्रयोगाची पंचक्रोशीत चर्चा होत आहे.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page