‘हा’ तरुण ठरतोय अल्पभूधारक शेतकऱ्यांना ‘आदर्श’. एक एकर शेतातून चारा बेणे विकून 25 लाखांची कमाई | हे घडलंय अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात.

Advertisement

 

टीम कृषी योजना / Krushi Yojana

Advertisement

पारंपरिक शेती करत असताना श्रम व कष्ट यांची सांगड घातली तर हातात मिळणार पैसा अत्यल्प असतो,सर्वच शेतकरी शाश्वत नफा कमावतात असे नाही त्यात प्रामुख्याने अल्पभूधारक असलेल्या शेतकऱ्यांना सतत।अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु या सर्व अडचणींवर मात करत अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात एका शेतकऱ्याने कमाल केली।आहे. सोमेश्वर लवांडे या युवा शेतकर्‍याने शेती व्यवसायात वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शोध सुरु घेतला.
नवनवीन पिकांचा शोध घेत चार विदेशी आणि सात भारतीय फोर जी बुलेट नेपियरया 4G Bullet Super Napier चारा पिकांची लागवड केली त्यात यश मीळण्यासाठी तीन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आता शेतकऱ्यांना त्याच्या बीयानांची विक्री करत लाखोंची कमाई सुरु केली आहे. ( ‘This’ is becoming an ‘ideal’ for young minority farmers. Earnings of Rs. 25 lakhs by selling fodder seedlings from one acre farm This happened in Nevasa taluka of Ahmednagar district.)

राज्यातील अनेक युवा शेतकरी आपल्या शेतीत नव नविन प्रयोग करतायेत त्यात अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील फत्तेपूर येथील सोमेश्वर लवांडे हा तरुण शेतकरी जेमतेम बारावीपर्यंत शिक्षण आणि एकच एकर शेती असलेल्या सोमेश्वर लवांडे या शेतकर्‍याने तब्बल तीन वर्षाच्या कष्टानंतर चारा उद्योगात मोठे यश मिळवले आहे

Advertisement

इतकंच नव्हे तर इतर शेतकर्‍यांनाही शाश्वत उत्पन्न देखील मिळवून दिलं आहे. नेवासा तालुक्यातील फत्तेपूर गावातील सोमेश्वर लवांडे या शेतक-याला केवळ एक एकर शेती त्यांनी इंडोनेशीया, थायलंड,ऑस्ट्रेलिया,बांग्लादेश या परदेशी जातीच्या चार वाणांची लागवड केली तसेच स्वदेशी सात नेपियर जातीच्या चार्‍याची लागवड त्यांनी केली.
कमी वेळेत अधिक उत्पादन आणि दूधासाठी सकस असलेला हा चारा दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या पसंतीस उतरला आहे.सोमेश्वरने सुरुवातीला थायलंड वरुन आणलेल्या 4 जी बुलेट सुपर नेपियर 4G Bullet Super Napier या जातीचे चारा बेणे आणून एक गुंठा क्षेत्रात त्याची लागवड केली.
2.5 ते 3 महिन्यात हे मोठे झालेले बेणे तोडून पुन्हा वाढीव क्षेत्रात त्याची 3 फूट बाय 1 फूट अंतरावर सरी पद्धतीने लागवड केली. हे लागवडीचे क्षेत्र वाढवत नेऊन आज 2 एकर क्षेत्रात सुपर नेपियर जातीचे चारा पीक उभे आहे.अनेक अडथळे, नुकसान सोसल्यानंतर लवांडे यांचा हा चारा प्रयोग चांगलाच यशस्वी ठरला आहे.

लॉकडाऊनच्या काळात इतर शेतकर्‍यांना चारा बेणे विकुन जवळ पास पंचवीस लाखाचा नफा मिळवला आहे. दूध उत्पादक शेतकर्‍यांना महागडा चारा विकत घेऊन दूध धंदा करावा लागतो. मात्र त्यामुळे उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी शेतकर्‍यांची अवस्था होते. मका पिकावर लष्करी अळीचं संकट बघता चारा घटल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

Advertisement

त्यामुळे विदेशी नेपियर 4G Bullet Super Napier  हे दूध धंद्यासाठी वरदान ठरत आहे. अनेक शेतकरी लवांडे यांच्याकडे बियाणे खरेदीसाठी संपर्क साधत आहेत.

अल्पभूधारक असल्याने आसपासच्या शेतकर्‍यांशी करार करत लवांडे यांनी इतर शेतकर्‍यांना देखील आर्थिक पाठबळ मिळून दिले आहे. गावातील अनेक शेतकरी या चारा उद्योगात उतरले आहेत. कमी पाणी, तात्काळ उत्पादन आणि शेतकर्‍यांची मागणी यामुळे गावात चारा उद्योग बहरला आहे.त्यासाठी सहा तरूणांची टिम अहोरात्र मेहणात घेत आहे.
पिकाची वैशिष्ट्ये- पिकाची वाढ- 18 ते 20 फूट, सर्वात जास्त प्रथिने – (15 ते 18%), मुरघास साठी उपयुक्त, एका वर्षाला 3 कापण्या, 5 ते 6 वर्षे चालणारा जलद वाढ होणारा वाण.लागवड पद्धत – या चारा पिकाची लागवड करण्यासाठी एकरी 12 हजार डोळे लागतात. सरी पद्धतीने 3 फूट बाय 1 फूट अंतरावर एक डोळा पद्धतीने लागवड करावी.
एका डोळ्यापासून 40 ते 50 फुट निघतात. 2.5 ते 3 महिन्यात चार्‍याची पहिली कापणी होते.दर 3 महिन्यांनी पुढील कापण्या होऊन एका वर्षात 3 कापण्यांमध्ये एक एकरातून किमान तीनशे टन हिरवा चारा उपलब्ध होऊ शकतो.पारंपारीक नेपीयर गवताला काटे,कुस,लव असते त्या मुळे शेतकरी वैतागला होता
त्यालाच पर्याय म्हणुन विदेशी नेपीयर फायद्याचे ठरतय कारण त्याला काटे ,रुस लव नाही मक्या सारख कसदार आणि चोपडे आहेत.शेतकरी प्रती वर्षी विदेशात जावुन शेतीचा अभ्यास मोठा खर्च करत करतात मात्र विदेशात न जाता विदेशातील घास बेणे आणुन त्याची यशस्वी लागवड सोमेश्वरने केली आहे.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page