Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

सर्व अंदाज चुकवत मान्सूनचे महाराष्ट्रात दमदार आगमन.

 

कृषी योजना / Krushi yojana

सर्वांचे अंदाज चुकवत केरळमधून वेगवान वाटचाल करत मान्सूनचे महाराष्ट्रात दमदार आगमन झाले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाच्या ५ दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून शेतकरी समाधानी झाला आहे.पाऊसाचे लवकर आगमन झाल्याने खरिपाच्या कामांना जोर येणार आहे. ‘मान्सून आज‌ महाराष्ट्रात दाखल झाला. मान्सून रेषा राज्यात द.कोकणात हर्णे पर्यंत तसेच द.मध्य महाराष्ट्रात सोलापूरपर्यंत आहे. मराठवाड्याचा काही सलग्न भाग असून परिस्थिती पुढच्या वाटचालीसाठी अनुकूल आहे,’ अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

ही महत्वाची बातमी वाचा – शेतकऱ्यांसाठी शासकीय योजना प्रत्येक महिन्याला मिळणार 3000 रुपये.

भारतीय हवामान विभागाकडून या पूर्वी मान्सून महाराष्ट्रात १० जूनला दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. सर्व अंदाज चुकवत ३ जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर सहा ते सात दिवसात मान्सूनचं आगमन होईल, असं सांगितलं गेलं. मात्र वेगवान प्रवास करत आज मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. यंदा देशभरात चांगल्या पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशातील विविध भागात वेळेच्या आधीच मान्सूनचं आगमन झालं.

आतापर्यंत गोवा, महाराष्ट्रातील काही भाग, दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा काही भाग, तामिळनाडू हा भाग मान्सूनने व्यापला आहे.

1 thought on “सर्व अंदाज चुकवत मान्सूनचे महाराष्ट्रात दमदार आगमन.”

Leave a Reply

Don`t copy text!