टीम कृषी योजना /krushi Yojana
आपणास पैशांची गुंतवणूक करायची आहे आणि कुठे गुंतवणूक करावी ज्या ठिकाणी सुरक्षितता असेल तसेच चांगला फायदाही होईल असा आपला विचार असेल तर ही योजना आपल्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते.या योजनेत आपणास दुप्पट परतावा देखील मिळेल.पोस्ट ऑफिसची विभागाची ‘किसान विकास पत्र’ (Kisan Vikas Patra) ही ती योजना आहे.
काय आहे किसान विकास पत्र योजनेचे स्वरूप
किसान विकास पत्र ही भारत सरकारची वन टाइम इन्वेस्टमेंट स्कीम आहे, या योजनेत एक निश्चित कालावधी मध्ये आपले पैसे दुप्पट केले जातात. ‘किसान विकास पत्र’ योजना देशातील सर्व पोस्ट ऑफिस आणि मोठ्या बँकांमध्ये उपलब्ध आहे. मॅच्युरिटीचा कालावधी सध्या 124 महिने आहे.124 महिन्यानंतर आपल्या योजनेचे व्याजासह पैसे परत मिळतात.
ही योजना विशेषतः शेतकऱ्यांसाठी तयार केली गेली आहे जेणेकरून ते त्यांच्या पैशाची दीर्घकाळ बचत करू शकतील. या योजनेत कमीतकमी 1000 रुपये गुंतवणूक करता येते.
किसान विकास पत्र योजनेत कोण करू शकते गुंतवणूक..?
किसान विकास पत्र ( Kisan vikas patra ) या योजनेत गुंतवणूक करणार्या व्यक्तीचे किमान वय हे 18 वर्षे पूर्ण पाहिजे. यामध्ये सिंगल अकाउंट व्यतिरिक्त, जॉईंट अकाउंटची सुविधा देखील आहे. त्याचबरोबर ही योजना अल्पवयीन मुलांसाठी देखील उपलब्ध आहे,परंतु त्याची देखभाल पालकांनी करावी. ही योजना हिंदू अविभाजित कुटुंब म्हणजे HUF किंवा NRI वगळता ट्रस्टसाठी देखील लागू आहे. किसान विकास पत्रात (KVP) गुंतवणूकीसाठी 1000, 5000 रुपये, 10,000 आणि 50,000 रुपयांपर्यंतचे सर्टिफिकेट आहेत, ती खरेदी करता येतील.
व्याज दर आर्थिक वर्ष 2021 च्या पहिल्या तिमाहीत KVP चा व्याज दर 6.9 टक्के निश्चित करण्यात आला आहे. येथे आपली गुंतवणूक 124 महिन्यांत दुप्पट होईल. जर तुम्ही एक लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 2 लाख रुपये मिळतील. या योजनेचा कालावधी 124 महिन्यांचा आहे. ही योजना आयकर कायदा 80 C अंतर्गत येत नाही. त्यामुळे परत आलेल्या परताव्यावर टॅक्स आकारला जातो.
या योजनेत TDS कपात केली जात नाही.
ट्रांसफर करण्याचीही सुविधा आहे
जारी झाल्यापासून अडीच वर्षांनंतर ‘किसान विकास पत्र’ योजना एका पोस्ट ऑफिसमधून दुसर्या पोस्ट ऑफिसमध्ये देखील ट्रांसफर केली जाऊ शकते. किसान विकास पत्र एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे ट्रांसफर केला जाऊ शकतो.Kisan Vikas Patra मध्ये नॉमिनीची सुविधा देखील उपलब्ध आहे.
ही कागदपत्रे आवश्यक आहेत
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, KVP फॉर्म, पत्ता पुरावा आणि बर्थ सर्टिफिकेट आवश्यक आहे.
किसान विकास पत्र योजना बद्दलची माहिती आपणास आवडल्यास आपण आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस अथवा बँकेत जाऊन योजनेत सहभागी होऊ शकता.
वरील माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना पाठवा.