Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार या योजनेचा निधी;  आदेश जारी.

 

टीम कृषी योजना / Krushi Yojana

सरकारने महत्वकांक्षी योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना राबवली आहे. या योजनेत निवडलेल्या गावांमध्ये अंमलबजावणी करण्याकरता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प संचालक यांच्याकडून अर्थसहाय्य या उद्दिष्टाखाली २०२.४३ कोटी व १७५.०० कोटी आणि राज्य रु.२७.४३ कोटी निधी वितरीत करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. त्या नुसार योजनेची
अंमलबजावणीसाठी १७५ कोटी व राज्य हिस्स्याचे २७.४३ कोटी असा एकूण २०२.४३ कोटी निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

हे ही वाचा..

सदर प्रकल्प माध्यमातून सदर गावांमध्ये हवामान बदलास अनुकूल शेती पध्दती विकसित करण्याच्या हेतूने प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये टप्याटप्याने प्रकल्प राबविण्यात येत असून गावांचे सूक्ष्म नियोजन, आराखडे तयार करुन प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु झालेली आहे.

मराठवाडयात हवामान बदलास संवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील ४२१० गावे व पूर्णा नदीच्या खोऱ्यातील ९३२ गावे असे एकूण ५१४२ गावांमध्ये ६ वर्ष कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे रू. ४००० कोटी खर्चाचा नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प राबविण्यात मान्यता देण्यात आली आहे.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना प्रकल्पांतर्गत विविध बाबींची अंमलबजावणी करण्याकरिता रु.२०२.४३ कोटी रुपये अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरण करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

Leave a Reply

Don`t copy text!