Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

राज्यातील ‘या’ भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडणार ; 4 दिवस कोसळणार पाऊस.

 

टीम कृषी योजना / Krushi Yojana

अरबी समुद्राकडून बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढला आहे. कोकणचा भाग , मध्यमहाराष्ट्र आणी मराठवाड्यामध्ये पावसाने चांगलाच जोर पकडला आहे आहे. पुढील चार ते पाच दिवस कोकण व पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडणार आहे.( Heavy rains with thunderstorms will hit this part of the state; Rain for 4 days.) आज (ता.१२) राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.
मागील दोन दिवसांन पासून आंध्रप्रदेश व दक्षिण ओडिसा किनाऱ्या जवळील बंगाल उपसागरात कमीदाबाचे क्षेत्र तयार झाले असून. पश्चिम राजस्थानते बंगालच्या उपसागरा मधीलल कमी दाबाच्या क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

अरबी समुद्रावरून वाऱ्यांचे प्रवाह वाहत आहेत. पुढील काही दिवस जोरदार पाऊस होण्याची जोरदार शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या राज्यातील अनेक भागात पाऊस पडत आहे. त्यामुळे हवेत चांगलाच गारवा तयार झाला आहे. कमाल तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. सोमवारी (ता.१२) सकाळी आठ वाजेपर्यंत मालेगाव येथे ३४.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.

राज्यातील अनेक भागांत पाऊस पडत असल्याने कमाल तापमानात चांगलीच घट झाली आहे. विदर्भात अधूनमधून ऊन पडत असल्याने या भागात २८ ते ३४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते. मराठवाड्यात ३१ ते ३३ अंश सेल्सिअस, मध्य महाराष्ट्रात हवेत गारवा असल्याने कमाल तापमान २१ ते ३४ अंश सेल्सिअस, कोकणात २७ ते ३१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते.
वायव्य भारतात मॉन्सूनची प्रगती
तीन दिवसांपासून बंगालच्या उपसागरावरून येत असलेले वाष्पयुक्त वारे, ढगांचे वाढलेले आच्छादन, पावसाला सुरूवात झाल्याने राजस्थान आणि पंजाबचा बहुतांशी भाग, हरियाना आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागांत मॉन्सूनने प्रगती केल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. वायव्य भारतात १९ जूननंतर थांबलेला मॉन्सूनचा प्रवास सुरू झाला आहे.

‘या’ जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार : मंगळवार – संपूर्ण कोकण, कोल्हापूर, चंद्रपूर, सातारा, वर्धा, जालना, लातूर, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, परभणी, वाशीम, नागपूर, औरंगाबाद, यवतमाळ.
बुधवार – संपूर्ण कोकण, हिंगोली, पुणे, सातारा, नांदेड, परभणी, कोल्हापूर, जालना,अकोला, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा.
गुरुवार – परभणी, लातूर, पुणे, बीड, औरंगाबाद, सातारा, जालना, कोल्हापूर, कोकण.
शुक्रवार – संपूर्ण कोकण, जालना, सातारा, औरंगाबाद, पुणे.

Leave a Reply

Don`t copy text!