योग्य तंत्रज्ञानाचा वापर केल्यास अवर्षण परिस्थिती ऊस उत्पादन घेणे शक्‍य 

Advertisement

 

अहमदनगर जिल्ह्याची ओळख अवर्षण प्रवण जिल्हा असून उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते उन्हाळ्यात जमिनीतून तसेच ऊसाच्या पिकातून पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाल्याने ऊस उत्पादनात घट होते त्यासाठी योग्य तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ऊसाचे चांगले उत्पन्न घेणे शक्‍य होते.With proper technology, it is possible to produce sugarcane in drought conditions

Advertisement

श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषी विज्ञान केंद्र, दहिगाव-ने मार्फत करुणा वारीच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष शेतकऱ्यांना एकत्रित न करता ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षित करण्यासाठी प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. श्याम सुंदर कौशिक वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख हे होते.

अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. श्याम सुंदर कौशिक यांनी ऊस पिकाचे उन्हाळ्याच्या दिवसात योग्य उत्पादन घ्यायचे असल्यास व पिकावर पाण्याचा ताण पडू द्यायचा नसल्यास ऊस पिकावर 2 % युरिया किंवा डी.ए.पी ची फवारणी करावी तसेच सिलिकॉन या अन्नद्रव्यांचा वापर करावा असे सांगितले. अवर्षण परिस्थितीत ऊस पिकास सरी आड सरी ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देण्याविषयी इंजि. राहुल पाटील यांनी मार्गदर्शन केले.

Advertisement

कार्यक्रम सहाय्यक श्री प्रकाश बहिरट यांनी ऊस खोडवा पिकात पाचट आच्छादनाचे महत्व व त्याचा पाणी संवर्धनासाठी वापर याविषयी मार्गदर्शन केले. श्री नारायण निबे शास्त्रज्ञ कृषी विद्या यांनी अवर्षण परिस्थितीत उसाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी पाण्याचा ताण सहन करण्याचा ऊस जातीची लागवड एकरी एक गोणी पोटॅश त्याचप्रमाणे 8% केओलिन फवारण्याचे शेतकऱ्यांना आव्हान केले.

 

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page