टीम कृषी योजना /Krushi Yojana
आपल्या घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यावर ते कुटुंबाचा आधार जातो.गोरगरीब कुटुंबातील व्यक्तींवर तर आभाळच कोसळेते. या दुःखद क्षणी त्या शेतकरी कुटूंबास आधार देण्यासाठी राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघाती विमा योजना गेल्या काही वर्षांपासून सुरू केली आहे. परंतु शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियास या योजनेबद्दल अधिक माहिती नसल्यामुळे अनेकदा या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागते. तर आज आपण या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
काय आहे योजनेचे स्वरूप .?
अपघाती निधन म्हणजेच शेती व्यवसाय करतांना वीज पडणे, पूर, विजेचा शॉक बसणे इ. नैसर्गिक आपत्ती, सर्पदंश, विंचूदंशमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहीना कायमचे अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तिस तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यास झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते अशा वेळी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने द्वारे त्या शेतकरी कुटुंबियास आधार देण्याचं काम होत आहे.
अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस व त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी राज्यातील सर्व वहिती धारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्याच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही 1 सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी
यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे 10ते 75 वयोगटातील एकुण 2 जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास संदर्भ क्र. (1) येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
शेतकरी अपघात विम्याचा लाभ घेण्यासाठीची प्रक्रिया
जयका इंश्युरन्स ब्रोकरेज प्रायव्हेट लिमिटेड – टोल फ्री क्रमांक १८०० २३३ ३५३३
किंवा
युनिव्हर्सल सोम्पो जनरल इंश्युरन्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेड- १८०० २०० ५१४२
लक्षात असूद्या की ‘जयका’ ही विमा कंपनी नाही. ती विमा सल्लागार कंपनी आहे. ‘युनिव्हर्सल’ ही यातील मूळ विमा कंपनी आहे. मात्र माहितीसाठी शेतकरी दोन्ही कंपन्यांचे टोल फ्री क्रमांक वापरू शकतात.
योजनेचा लाभ घेण्यासाठी दुर्घटनेनंतर शक्यतो पाहिले ४५ दिवसाच्या आत सूचना द्यावी लागते. ती जबाबदारी शेतकरी किंवा त्यांच्या नातेवाईकांची असते. माहिती दिल्या नंतरची जबाबदारी सल्लागार कंपनी व विमा कंपनीची आहे.सूचना देताना एक काळजी घेण्याची गरज आहे. अत्यावश्यक कागदपत्रे सातबारा उतारा, मृत्यूचा दाखला, एफआयआर (प्रथम माहिती अहवाल), घटनास्थळाचा पोलीस पंचनामा, वयाचा दाखला द्यावा लागेल.
गावच्या हद्दीत संबंधित शेतकरी किंवा त्याच्या पात्र सदस्याचा विजेच्या धक्क्याने अपघात झाल्यास, वीज पडून किंवा बुडून मृत्यू झाल्यास, उंचावरून पडून मृत्यू झाल्यास, सर्पदंश,विंचूदंश किंवा कोणत्याही कारणास्तव अपघात झाल्यास पोलिसांचा ‘एफआयआर’ अत्यावश्यक असतो.
एखाद्या घटनेत जर पोलीस अहवाल उपलब्ध नसेल तर पोलिस पाटलाने दिलेला अहवाल देखील ग्राह्य धरला जातो.
मूळ स्वरूपात द्यावी लागणारी कागदपत्रे.
अपघात विमा योजनेचा दावा अर्ज तालुका कृषी अधिकाऱ्याच्या कार्यालयात दाखल करावा लागतो.त्या सोबत सातबारा, गाव नमुना क्रमांक सहा-ड अथवा फेरफार नोंदीबाबतचे प्रमाणपत्र, गाव नमुना क्रमांक सहा-क अथवा वारस नोंदीबाबतचे प्रमाणपत्र हे मूळ स्वरूपात द्यावे लागते. तसेच प्रतिज्ञापत्र ओरिजिनल स्वरूपात द्यावे लागते.
शिधापत्रिकेची छायांकित प्रत मात्र सरकारी राजपत्रित अधिकाऱ्याने साक्षांकित केलेली असावी. कृषी अधिकारी यांचीही स्वाक्षरी चालू शकते.
वयाचा पुरावा म्हणून शेतकरी जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक कार्ड यापैकी कोणताही एक पुरावा चालतो.
वरील माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना शेअर करा ,अपघाती मृत्यू झाला असेल अशा शेतकरी कुटुंबांना या योजनेची माहिती द्या आपल्यामुळे एखाद्या कुटुंबियास आधार मिळू शकतो.
वरील प्रमाणे इतर शेती विषयी बातम्या,कृषी योजना,हवामान अंदाज,बाजार भाव माहिती साठी आमच्या या वेब साईट ला अवश्य भेट देत जा.
धन्यवाद