टीम कृषी योजना/Krushi Yojana
नैऋत्य मोसमी पाऊसाने राज्य व्यापल्या नंतर गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. परंतु तो सर्वदूर सारखा पडत नसून कोकणचा भाग सोडला तर इतर ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. सोयाबीन, तूर ,भुईमूग व मका या पिकांच्या नियोजनाकरिता पेरणीची पूर्वतयारीची कामे करावीत. विदर्भामध्ये भात पिकासाठी रोपवाटिकेचीची पूर्वतयारी चालू ठेवावी. खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड, पूर्व मशागतीची कामे करावीत. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका या खरीप पिकांच्या पेरणीसाठी शेतजमीन नांगरणी व वाखराच्या पाळ्या देऊन तयार करावी.
महत्वाची योजना नक्की पहा – कांदा चाळ अनुदान योजना 2021 | योजनेची संपूर्ण माहिती व मार्गदर्शन
राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये.( All farmers in the state should not sow till at least 80 to 100 mm of rain falls. ) अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. ८०-१०० मि.मी. पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पीक तग धरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत मार्फत करण्यात आले आहे.