Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

मान्सूनच्या पाऊसास होणार सुरुवात ; पोषक वातावरण झाले निर्माण. जोरदार पाऊस सुरू होण्याची शक्यता ; हवामान विभाग

 

टीम कृषी योजना / Krushi Yojana

 

नैऋत्य मोसमी पाऊसाची वाट शेतकरी आभाळाकडे आस लावून बघत आहेत.मॉन्सूनचे आगमन झाल असले तरी,अद्यापपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पेरणी करण्या योग्य पाऊस पडला असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत.परंतु बुधवार दि. 23 जून 2021 पासून पाऊसाचे वातावरण निर्माण झाल्याचे आशादायक वातावरण निर्माण होत असून,आज दि.24 पासून विदर्भ, खान्देश व मराठवाड्यात मॉन्सूनच्या सरी बरसण्यास सुरुवात होण्याचे संकेत हवामान अभ्यासकांनी दिले असून चांगला पाऊस पडला तर सर्वत्र पेरणीचे चित्र दिसू शकेल.

बुधवार दि.23 जुन 2021 पासून खान्देश, विदर्भ व मराठवाडा विभागात मॉन्सून पुन्हा एकदा बरसायला सुरुवात होईल अशी शक्यता आहे. ( The onset of monsoon rains; A nutritious environment was created. Chance of heavy rain; Meteorological Department. )

उपग्रहानुसार पावसाची स्थिती २३ जूनच्या उपग्रह छायाचित्रानुसार, राज्यात नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव , बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांसोबत औरंगाबाद, बीड, नगर, लातूर, नांदेड, तर पुणे विभागात सातारा काही भाग सोलापूर काही भाग , कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यामध्ये तसेच संपूर्ण कोकणात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ( Chance of heavy rain; Meteorological Department. )

आर्द्रता ५० टाक्याच्या आसपास असून जमिनीपासून दीड-तीन किलोमीटर पर्यंत तेच प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत आहे या स्थितीमुळे सर्वत्र पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण आहे. तापमान २८ ते ३३ डिग्री सेल्सिअस दरम्यान आहे.

1 thought on “मान्सूनच्या पाऊसास होणार सुरुवात ; पोषक वातावरण झाले निर्माण. जोरदार पाऊस सुरू होण्याची शक्यता ; हवामान विभाग”

Leave a Reply

Don`t copy text!